Ank Jyotish Mulank 5 : अंकशास्त्रानुसार मूलांक 5 च्या लोकांवर गणपतीचा (Ganpati Bappa) विशेष आशीर्वाद असतो. तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल मूलांकांद्वारे जाणून घेऊ शकता. जर तुमची जन्मतारीख 5, 14 किंवा 23 असेल तर तुमची मूलांक संख्या 5 असते. या मूलांकाचा स्वामी बुध आहे आणि याच बुध ग्रहाचा कारक देवता गणपती बाप्पा आहे. त्यामुळे 5 अंक/मूलांक बाप्पाला प्रिय आहे.


यंदा 7 सप्टेंबर 2024 रोजी गणेश चतुर्थी आहे. या काळात देखील मूलांक 5 च्या लोकांवर बाप्पाची विशेष कृपा राहील. या दिवशी बाप्पाची पूजा करणं लाभदायक ठरेल.


धन, बुद्धी आणि आरोग्यदाता बाप्पा 


पुराणानुसार, श्रीगणेशाची आराधना केल्याने शत्रू आणि ग्रहांच्या अशुभ दृष्टीपासून रक्षण होते, म्हणूनच गणेशाला संकट दूर करणारा म्हटलं जातं. श्रीगणेशाची आराधना केल्याने कुंडलीतील बुधाची स्थिती मजबूत होते, ज्यामुळे माणसाला धन, बुद्धी आणि उत्तम आरोग्य प्राप्त होते.


गणेश चतुर्थीच्या दिवशी करा हे उपाय (Ganesh Chaturthi 2024 Remedies)


मूलांक 5 च्या लोकांनी गणेश चतुर्थीला काही उपाय (Ganesh Chaturthi Remedies) केले पाहिजे. या विशेष उपायांमुळे बाप्पाची कृपा प्राप्त होते आणि सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते.


गणपतीला दुर्वा अर्पण करा.
बाप्पाला हिरव्या वस्तू दान करा.
मुलांना वाचन आणि लेखन साहित्य भेट द्या.
गाईला हिरवा चारा द्या.
रुग्णालयांना आवश्यक औषधं दान करा.
नपुंसकांना देणगी द्या.


गणेश मंत्राचा जप करा


गणेश चतुर्थीच्या दिवशी मूलांक 5 असलेल्या लोकांनी 108 वेळा गणेश मंत्राचा जप करावा. बाप्पाचा हा शक्तिशाली मंत्र जीवनात आनंद आणतो. बुद्धीदाता गणेश भक्तांचं जीवन संपत्ती आणि धनधान्याने भरतो. नोकरी, व्यवसाय आणि करिअरमधील सर्व अडथळे नष्ट करतो. 


गणेश चतुर्थीला चंद्र का पाहू नये?


पौराणिक कथेनुसार एके दिवशी भगवान गणेश आपले वाहन असलेले मुषक म्हणजे उंदरावर स्वार होऊन फिरायला गेले होते. त्यावेळी अचानक उंदीर अडखळला. ते पाहताच चंद्राला हसू अनावर झाले. चंद्राच्या या कृतीवर गणेश क्रोधित झाले आणि त्यांनी चंद्राला शाप दिला. 


रागाच्या भरात गणेशाने चंद्राला शाप दिला


भाद्रपद महिन्यातील शुक्ल चतुर्थीच्या रात्री चंद्र पाहेल त्याच्यासमोर संकट उभं राहील. त्याच्यावर गणेशाची कृपा होणार नाही. तसेच त्याच्यावर खोटे आरोप केले जातील असा शाप गणेशाने दिला. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Ganeshotsav 2024 : यंदाचा गणेशोत्सव 4 राशींसाठी ठरणार खास; 7 सप्टेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले