Numerology Mulank 3 : ज्योतिषशास्त्रात ज्या पद्धतीने राशीच्या (Zodiac Signs) माध्यमातून व्यक्तीच्या भविष्याचा अंदाज लावला जातो अगदी त्याच पद्धतीने अंकशास्त्रात (Ank Shastra) देखील व्यक्तीच्या जन्मतारखेवरून भविष्याचा अंदाज लावता येतो. अंकशास्त्रानुसार, प्रत्येक मूलांकाचं (Moolank) एक खास वैशिष्ट्य असतं. अंकज्योतिष (Numerology) शास्त्रात मूलांक 3 च्या लोकांबद्दल अनेक वैशिष्ट्य सांगण्यात आली आहेत. 


कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 3 असतो. मूलांक 3 चा स्वामी ग्रह गुरु आहे. गुरु ग्रहाला सुख, शांती, वैभव आणि ऐश्वर्याचा कारक मानला जातो. या जन्मतारखेच्या लोकांची खास वैशिष्ट्ये कोणती ते जाणून घेऊयात. 


'ही' असतात खास वैशिष्ट्ये


अंकज्योतिष शास्त्रानुसार, मूलांक 3 असणारे लोक सकारात्मक विचारसरणीचे असतात. हे लोक आपल्या आजूबाजूला देखील पॉझिटिव्ह वातावरणनिर्मिती करतात. 'जगा आणि जगू द्या'या तत्त्वाला हे लोक फॉलो करतात. तसेच, आपल्या जवळच्या व्यक्तीला, सतत खुश ठेवण्याचा यांचा प्रयत्न असतो. हे लोक कधीच आपलं ज्ञान स्वत:पुरतं सीमित ठेवत नाहीत. तर, इतरांशी देखील ते शेअर करतात. या जन्मतारखेचे लोक प्रामाणिक, विश्वासू असतात. तसेच, वाईट सवयींपासून हे तसे दूरच असतात. 


'ही' असते या जन्मतारखेच्या लोकांची कमजोरी 


असं म्हणतात की, जेव्हा मूलांक 3 चे लोक आपल्या अस्तित्वाशी खुश नसतात, किंवा जर त्यांच्या मनासारखी एखादी गोष्ट घडली नाही तर हे लोक लगेच निराश होतात. यांना सतत परफेक्ट दिसायचं असतं. पण, आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की कोणीही परफेक्ट नसतं. मात्र, या जन्मतारखेचे लोक ही गोष्ट स्वत:ला समजावू शकत नाहीत. त्यामुळे अनेकदा हे लोक इतरांच्या चर्चेचा विषय ठरतात. 


मूलांक 3 असणारे लोक आर्थिक बाबतीत मजबूत असतात. ते नेहमीच आपलं भविष्य आणखी उज्ज्वल कसं करता येईल याचा विचार करतात. हे लोक चांगले शिक्षक, मार्गदर्शन, लेखक किंवा प्रोफेसर होऊ शकतात. 


अत्यंत महत्वाकांक्षी असतात 'हे' लोक


मूलांक 3 चे खूप महत्वाकांक्षी असतात, त्यांची मोठी स्वप्नं असतात. त्यांच्या ध्येयाप्रती ते एकनिष्ठ असतात. मोठ्या मोठ्या गोष्टी साध्य करण्याची हिंमत त्यांच्यात असते. आपल्या प्रयत्नांच्या जोरावर ते हवं ते सर्व साध्य करतात. या मूलांकाचे लोक त्यांच्या स्वातंत्र्याशी कधीही तडजोड करत नाहीत. याबरोबरच मूलांक 3 चे लोक हे धैर्यवान, शूर, सामर्थ्यवान, संघर्ष करणारे आणि कधीही हार न मानणारे असतात. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Numerology : प्रचंड हट्टी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; ठरवलं ते करुनच राहतात, त्याशिवाय यांचं डोकं होत नाही शांत