Numerology : अंकशास्त्रामध्ये (Ank Shastra) प्रत्येक मूलांकाच्या संख्येला विशेष महत्त्व आहे. या मूलांक (Moolank) संख्येवरून कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव, त्याचं व्यक्तिमत्त्व ओळखता येते. त्याचप्रमाणे अंकशास्त्रात (Numerology) मूलांक 8 हा खूप खास मानला आहे. कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक क्रमांक 8 असतो. हा मूलांक शनीचा अंक मानला जातो. अंकशास्त्रानुसार ज्यांचा मूलांक 8 असतो अशा लोकांवर शनीची विशेष कृपा असते. शनीचा यांच्यावर आशीर्वाद असल्याने या मूलांकाच्या लोकांना जीवनात खूप यश मिळते. मूलांक 8 मध्ये आणखी कोणकोणत्या खास गोष्टी आहेत ते जाणून घेऊयात. 


शांत आणि गंभीर स्वभाव 


मूलांक 8 असलेले लोक अंतर्मुख स्वभावाचे असतात. हे लोक संसाराच्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवतात. या मूलांकाचे लोक अतिशय शांत, गंभीर आणि निष्पाप स्वभावाचे असतात. तसचे, हळूहळू यशाच्या शिखराच्या पायऱ्या चढतात. 8 वा क्रमांक असलेले लोक खूप मेहनती असतात आणि कठोर परिश्रमाने आपले स्थान प्राप्त करतात. या लोकांनी एकदा एखादे ध्येय निश्चित केले की ते साध्य केल्यावरच ते समाधानी मानतात. या मूलांकाचे लोक अपयशाने निराश होत नाहीत तर पूर्ण धैर्याने आलेल्या संकटांचा सामना करतात. या लोकांना शैक्षणिक क्षेत्रात थोडा संघर्ष करावा लागतो. 


शनीची कृपा राहते


शनी हा मूलांक 8 चा स्वामी मानला जातो. यामुळेच 8 अंक असलेल्या लोकांवर शनीची कृपा नेहमीच असते. शनीच्या आशीर्वादाने त्यांच्या आयुष्यात कधीही पैशांची कमतरता भासत नाही. त्यांचे आर्थिक जीवन खूप चांगले असते. या लोकांची बचत करण्याची प्रवृत्ती चांगली असते. या नंबरची खास गोष्ट म्हणजे ते कधीही फालतू खर्च करत नाहीत. या मूलांकाचे लोक पैसे मिळवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात. हे लोक फार कमी लोकांशी मैत्री करतात पण त्यांचे मित्र खूप खरे असतात. 


प्रेम आणि वैवाहिक जीवन


8 क्रमांकाचे लोक प्रेमाच्या बाबतीत भाग्यवान नसतात. त्यांचे प्रेमसंबंध फार काळ टिकत नाहीत. नात्यात अनेकदा त्यांची फसवणूक होते. त्यांच्या जोडीदारापासून वेगळे होण्याची शक्यता असते. तसेच, या लोकांचं लग्न खूप उशिरा ठरते. या रॅडिक्स नंबरच्या काही लोकांना मुले होण्यास विलंब होतो. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Astrology : आज वृद्धी योगासह बनतायत अनेक शुभ योग; सिंह राशीसह 'या' 5 राशींच्या धन-संपत्तीत होणार वाढ, हनुमानाचीही राहील विशेष कृपा