Numerology: अनेकदा आपण पाहतो, बरेच लोक असतात, ज्यांनी कितीही मुलाखती दिल्या किंवा शिक्षण जरी उत्तम असलं तरी त्यांना सहजासहजा नोकरी मिळत नाही. आणि जरी ती मिळाली, तरी ऑफिसमधील सहकाऱ्यांच्या षडयंत्राला ते बळी पडतात. पण असेही काही लोक असतात, अंकशास्त्रानुसार ते इतकी भाग्यशाली असतात की त्यांना नोकरी तर मिळतेच, मात्र हे लोक षडयंत्राला कधीच बळी पडत नाहीत, उलट ते अशा लोकांच्या नाकावर टिच्चून यशाची पायरी चढत राहतात. अंकशास्त्रानुसार, आज आम्ही अशा जन्मतारखेच्या लोकांबद्दल सांगणार आहोत, जे लोक नोकरीत मोठी प्रगती करतात, बऱ्याचदा सरकारी नोकरी त्यांच्या नशीबात असते.
जे लोक नोकरीत मोठी प्रगती करतात...
अंकशास्त्रात मूलांकाला खूप महत्त्व मानले जाते. असे म्हटले जाते की मूलांकवरून कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तिमत्व आणि भविष्य कळू शकते. मूलांकावरून आपल्याला भविष्य कसे असेल, भविष्यात तुम्ही किती यशस्वी व्हाल हे कळू शकतो. अंकशास्त्रानुसार, आज आम्ही अशा जन्मतारखेच्या लोकांबद्दल किंवा मूलांकाबद्दल सांगणार आहोत, जे लोक नोकरीत मोठी प्रगती करतात, बऱ्याचदा सरकारी नोकरी त्यांच्या नशीबात असते. मूलांक 7 असलेल्या लोकांचे व्यक्तिमत्व आणि भविष्य कसे असेल ते जाणून घेऊया?
केतूचा अंक
अंकशास्त्रानुसार ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16 आणि 15 तारखेला झाला असेल, अशा लोकांचा मूलांक 7 असतो., मूलांक 7 ला केतूचा अंक म्हणतात. जन्मतारखेच्या दोन्ही अंकांची बेरीज ही मूळ संख्या म्हणजेच मूलांक असते. उदाहरणार्थ, जर तुमचा जन्म 16 तारखेला झाला असेल तर 1+6 ची बेरीज 7 असेल. म्हणून, तुमचा मूळ क्रमांक 7 असेल. अंकशास्त्रात, मूलांक 7 ला केतूचा अंक असेही म्हणतात. हे लोक त्यांच्या कारकिर्दीत प्रगती करतात. त्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये खूप यश मिळते.
ते अभ्यासातही तितके हुशार असतात
अंकशास्त्रानुसार, मूलांक 7 असलेले लोक अभ्यासात हुशार असतात. त्यांना खूप अभ्यास करायला आवडते. ते कधीही अभ्यासापासून दूर राहत नाहीत. ते नेहमीच लक्ष केंद्रित करून अभ्यास करतात आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतात. ते त्यांच्या वर्गात अव्वल असतात, प्रत्येक विषयात चांगले गुण मिळवतात.
सरकारी नोकरी त्यांच्या नशिबात
अंकशास्त्रानुसार, मूलांक 7 असलेल्या काही लोकांच्या नशिबात सरकारी नोकरी देखील असते. अभ्यासात सर्वोत्तम असण्यासोबतच ते त्यांच्या करिअरमध्येही प्रगती करतात. त्यांना सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता असते. ते सरकारी नोकऱ्यांमध्ये खूप प्रगती करतात, उच्च पदांवर पोहोचतात.
गोड भाषेचा वापर त्यांना यश मिळवून देतो...
अंकशास्त्रानुसार, मूलांक 7 असलेल्या लोकांचे वर्तन सौम्य असते. ते स्वभावाने मृदू असतात, फार कमी वेळा रागावतात. ते सर्वांशी प्रेमाने बोलतात, गोड भाषेचा वापर त्यांना पुढे नेऊ शकतो. त्यांच्या वागण्यातील ही सर्वात चांगली गोष्ट आहे.
हेही वाचा :
Numerology: ऑगस्टची सुरूवात होताच 'या' जन्मतारखेच्या लोकांचे 'अच्छे दिन' सुरू, बॅंक बॅलेन्स वाढणार, करिअरला मिळणार दिशा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)