Numerology: आपल्या आजूबाजूला आपण विविध स्वभावाची लोक बघतो. काही प्रेमळ, काही रागीट तर काही संशयी, तर काही जळक्या वृत्तीची अशी लोक आढळतात. अंकशास्त्रानुसार, आज आम्ही अशा जन्मतारखेच्या लोकांबद्दल सांगणार आहोत, ज्यापैकी काही लोकांशी संबंध ठेवणे खूपच कठीण असते, ते चांगले संबंध देखील बिघडवतात. त्यांच्या सोबत संपूर्ण आयुष्य काढणे म्हणजे एक शिक्षा असते. हे लोक राहू-केतूच्या प्रभावाखाली असतात. अंकशास्त्रानुसार जाणून घेऊया..


राहू-केतूच्या प्रभावाखाली असतात


अंकशास्त्रात प्रत्येक संख्येची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. मूलांक 1 ते मूलांक 9 पर्यंतच्या लोकांचे करिअर, प्रेम जीवन, वैवाहिक जीवन, आर्थिक स्थिती, स्वभाव, आरोग्य इत्यादी गोष्टी सांगितल्या जातात. हेच कारण आहे की एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेच्या म्हणजेच मूलांकाद्वारे बरेच काही जाणून घेता येते. अंकशास्त्रात अशा मूलांकांचा उल्लेख आहे, ज्यांवर राहू-केतू या क्रूर आणि पापी ग्रहांचा थेट परिणाम होतो. ज्यामुळे या लोकांना समजून घेणे आणि त्यांच्यासोबत राहणे कठीण होते. हेच कारण आहे की या लोकांचे सहसा त्यांच्या जोडीदारांशी चांगले संबंध नसतात. कधीकधी त्यांचे संबंध खूप टॉक्सिक बनतात.


या लोकांचे वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवन खूप कठीण असते.


अंकशास्त्रात अशा काही तारखांचा उल्लेख आहे ज्यात जन्मलेल्या लोक राहू-केतूच्या प्रभावाखाली असतात. यामुळे, या लोकांचे वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवन खूप कठीण असते. या लोकांशी संबंध ठेवणे हे एक मोठे आव्हान ठरते.


'या' जन्मतारखेच्या लोकांसोबत आयुष्य काढणं अत्यंत कठीण?


अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांची जन्मतारीख 4, 13 किंवा 22 आहे त्यांचा मूलांक 4 असतो. अंकशास्त्रानुसार, मूलांक 4 चा स्वामी ग्रह राहू आहे, त्यामुळे मूलांक 4 असलेले लोक राहूच्या प्रभावाखाली असतात. हे लोक राजकारणात, नेतृत्वात, व्यवसायात खूप चांगले असतात. त्यांना अचानक खूप प्रसिद्धी मिळते. पण ते वाईट सवयींनाही खूप लवकर बळी पडतात. ड्रग्ज, जुगार इत्यादींचे व्यसन लावून ते सर्वकाही सहज गमावतात. हे लोक खूप लवकर रागावतात आणि ते स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. ते खूप वर्चस्व गाजवणारे देखील असतात. त्यांचे एकापेक्षा जास्त संबंध असतात पण ते कोणाशीही जुळत नाहीत. यामुळेच त्यांचे वारंवार ब्रेकअप होणे, तसेच घटस्फोट होणे सामान्य आहे.


'या' जन्मतारखेचे लोक सहसा प्रेमात अपयशी ठरतात


अंकशास्त्रानुसार, ज्यांची जन्मतारीख 7, 16 किंवा 25 आहे त्यांचा मूलांक 7 असतो. मूलांक 7 चा स्वामी केतू आहे. मूलांक 7 असलेले लोक प्रामाणिक असतात आणि धर्म आणि अध्यात्मात रस घेतात. ते त्यांच्या जोडीदारांशी प्रामाणिक असतात आणि रोमँटिक देखील असतात परंतु प्रेम त्यांच्या नशिबात नसते. सहसा ते प्रेमात अपयशी ठरतात. त्यांच्या जोडीदाराला समजून घेणे आणि त्यांच्याशी सुसंगतता शोधणे त्यांच्यासाठी खूप कठीण असते. त्यामुळे त्यांचे प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवन चांगले नसते.


या जन्मतारखेचे लोक एकमेकांचे उत्तम जोडीदार बनतात..


आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की अंकशास्त्रानुसार, मूलांक 4 आणि मूलांक 7 असलेले लोक एकमेकांसाठी चांगले भागीदार ठरतात.


हेही वाचा :           


Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक म्हणजे स्वत:चं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून! फक्त दुसऱ्याचा पैसा गोड वाटतो? स्वतःचे खिसे रिकामे करत नाहीत.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)