Astrology Panchang Yog 8 March 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 8 मार्चचा दिवस म्हणजेच शनिवारचा दिवस आहे. आजचा दिवस शनीदेवाला (Shani Dev) समर्पित आहे. तसेच, आजच्या दिवशी चंद्राची स्थिती द्वादश भावात असणार आहे. आज फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाची नवमी तिथी देखील आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार आहे. तसेच, आज शनिवारच्या दिवशी शश राजयोग देखील जुळून आला आहे. त्यामुळे आजचा दिवस अधिक खास असणार आहे. आजच्या शुभ राशींना नशिबाची चांगली साथ मिळेल. तुम्ही हाती घेतलेली कामे पूर्ण होतील.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणरा आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. तसेच, तुमच्या मेहनतीला चांगलं यश मिळेल. तसेच, आरोग्य देखील उत्तम राहणार आहे. भविष्याच्या बाबतीत जास्त विचार करु नका. वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करा. असा महत्त्वाचा सल्ला आज मेष राशीला देण्यात आला आहे. नवीन लोकांशी भेटीगाठी होतील. त्यांच्याशी नीट संवाद साधा.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा असणार आहे. आज तुमच्या पंखांना बळ मिळेल. समाजातील नामांकित व्यक्तींशी तुमची भेट होईल. त्यांच्याकडून तुम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळेल. तसेच, शनीदेवाची तुमच्यावर कृपा असल्या कारणाने कोणत्याच वाईट गोष्टीची नजर तुमच्यावर नसणार आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. आज दिवसभरात तुम्हाला एखादी चांगली शुभवार्ता ऐकायला मिळेल. यामुळे तुमचा दिवस फार प्रसन्न जाईल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती फार चांगली असणार आहे. त्यामुळे पैशांची चणचण जाणवणार नाही. दानशूर वृत्ती कायम राहील. हा तुमच्यातला चांगला गुण आज अनेकांना दिसेल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आजच्या दिवशी तुमचा व्यवसाय अत्यंत जोरात सुरु असेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन ऑर्डर्स येतील. त्यामुळे तुम्ही फार व्यस्त असाल. पण तुम्ही खुश असाल. तसेच, मुलांची अभ्यासात रुची वाढलेली दिसेल. त्यांच्याकडे पाहून तुम्हाला समाधानी वाटेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. आज तुम्ही हाती घेतलेली कामे पूर्ण होताना दिसतील. त्यामुळे एक समाधान तुमच्या चेहऱ्यावर असेल. तुमच्या कार्यात येणारे अडथळे सामंजस्याने दूर करण्याचा प्रयत्न करा. तसेच, नको त्या गोष्टींना जास्त महत्त्व देऊ नका. आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष द्या. दिर्घकालीन आजार पुन्हा उद्भवू शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: