Maharashtra Weather: राज्यात तापमानाचा भडका उडाला असून मुंबईकरांना होळीपूर्वीच प्रचंड उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांना उन्हाचा चटका आणि उकाड्याला सामोरं जावं लागणार आहे. मुंबईसह, ठाणे, पालघर,कोकणपट्ट्यातील रायगड रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय.(Mumbai) पूर्वेकडील येणाऱ्या वाऱ्यांमुळे या भागात 40 अंश सेल्सियस ओलांडण्याचा अंदाज असल्याचं IMD ने सांगितलंय. येत्या पाचही दिवसात राज्यभरातील तापमान वाढणार असून 11 मार्चपर्यंत उष्णतेची लाट उत्तर व मध्य महाराष्ट्रातही धुळे, नाशिक जिल्ह्यापर्यंत राहणार असल्याचं सांगण्यात आलंय. (IMD forecast)
हवामान विभागाने काय दिलाय इशारा?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 7-11 मार्चपर्यंत कोकणपट्ट्यासह मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, धूळे, व नाशिक जिल्ह्यात प्रचंड उष्णता वाढणार असून या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक आणि धुळ्यास 11 मार्चला हा अलर्ट आहे. उर्वरित राज्यातही तापमानाचा पारा प्रचंड वाढला असून सर्वोच्च तापमानाच्या नोंदी होत आहे.
का वाढलंय मुंबई भागातील तापमान?
कोकणपट्ट्यातील जिल्ह्यांसह मुंबई, पालघर, ठाण्यात फेब्रुवारी महिन्यातच उष्णतेच्या पहिल्या लाटेनंतर मुंबईतील तापमानात किंचित घट झाल्याचे पहायला मिळाले.मात्र,तापमानातील हा दिलासा फार काळ टिकणार नसल्याचं हवामान खात्यानं सांगितलं होतं. दरम्यान, आता होळीपूर्वीच दुसरी उष्णतेची लाट नोंदवण्यात आलीय. त्यामुळे मुंबईसह कोकणात प्रचंड उष्ण आणि दमट वातावरण राहणार आहे. तापमानाचा पारा 37-38 अंशांपर्यंत जाऊन स्थिरावणार असल्याचं सांगण्यात येतंय. या दोन्ही उष्णतेच्या लाटा, एवढे प्रचंड तापमानझळा आणि वाढते तापमान याचे कारण हिवाळ्यातील पावसाची कमतरता असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान,पुढील काही दिवस इशान्येकडील वारे सक्रीय झाल्याने उत्तरेकडून येणाऱ्या शहरात पूर्वेकडील वारे वाहण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे तापमानात पुन्हा वाढ होत असल्याचं हवामानतज्ञांचे म्हणणे आहे.
कुठे कसं आहे तापमान?
प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरीसह सोलापुरात काल (7मार्च)ला सर्वाधिक 38 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. सांगली सातारा जिल्ह्यात 37 अंश तर कोल्हपुराचा पारा 36.2 अंश नोंदवला गेला. मराठवाड्यात सध्या रखरख वाढली असून पहाटे गारवा आणि दुपारी प्रचंड उष्णतेच्या झळा अशी स्थिती आहे. विदर्भ सध्या चांगलाच तापला असून वाशिम 37.4 अंश तर अकोला 36.5 अंशांवर गेलाय. मुंबई शहराता 35.3 अंश होते तर ठाण्यात 37.2अंशांवर पारा पोहोचला आहे.
हेही वाचा: