Numerology 16 Born People Personality : ज्योतिष शास्त्रानुसार, फक्त एखाद्या व्यक्तीची कुंडलीच पाहून त्या व्यक्तीचं भविष्य आणि स्वभाव ओळखता येतं असं नाही. तर, अंकशास्त्रानुसारही (Ank Shastra) व्यक्तीच्या जन्मतारखेच्या माध्यमातून व्यक्तीचा स्वभाव, त्याच्या आवडी निवडी ओळखता येतात. या ठिकाणी आपण आजच्या दिवशी म्हणजेच कोणत्याही महिन्याच्या 16 तारखेला जन्मलेल्या लोकांचा स्वभाव नेमका कसा असतो हे जाणून घेणार आहोत. 

Continues below advertisement

अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 16 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 7 असतो. हा अंक फार शुभ मानला जातो. 

कसा असतो स्वभाव?

या तारखेला जन्मलेल्या लोकांची पर्सनालिटी चुंबकासारखी असते. या लोकांचे डोळे मोठे असतात. तसेच, स्वभावाने हे लोक फार शांत असतात. या तारखेला जन्मलेल्या लोकांचं वैशिष्ट्य म्हणजे हे लोक कधीच प्रामाणिकपणाची साथ सोडत नाहीत. तसेच इतरांची मदत करण्यासाठी हे लोक कधीच मागे फिरत नाहीत. नेहमी मदतीचा हात पुढे करतात. लोकांची अडचण हे लोक फार सहजतेने ओळखतात. 

Continues below advertisement

अनेकदा या लोकांना ओळखणं तसं कठीणच वाटतं. कारण या जन्मतारखेच्या लोकांचा स्वभाव फार रहस्यमयी असतो. हे आपल्या भावना पटकन बोलून दाखवत नाहीत. मात्र, असे असले तरी हे लोक फार मोकळ्या विचारांचे असतात. यांच्या आजूबाजूच्या किंवा यांच्या सानिध्यात असलेल्या प्रत्येक लोकांना यांच्याबरोबर राहून फार पॉझिटीव्ह वाटतं. या जन्मतारखेच्या लोकांना फार कमी राग येतो. मात्र, जेव्हा राग येतो त्यावर नियंत्रण ठेवणं फार कठीण जातं. 

करिअर 

या जन्मतारखेला जन्मलेले लोक फार क्रिएटिव्ह असतात. टीचिंग किंवा क्रिएटिव्ह कामाकडे यांचा ओढा जास्त असतो. तसेच, कोणतंही काम करताना हे लोक फार मन लावून करतात. यामुळेच ज्या कोणत्या कामाला हे हात लावतात ते यशस्वीरित्या पूर्ण होतं. या जन्मतारखेला जन्मलेल्या लोकांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे लोक कोणत्याही संकटांचा सामना करायला घाबरत नाहीत. तसेच, या जन्मतारखेचे लोक बिझनेसमध्ये फार रमतात आणि यशस्वीही होतात. 

लव्ह लाईफ 

प्रेमाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, या जन्मतारखेचे लोक प्रेमाच्या बाबतीत थोडे भावनिक असतात. आपल्या जोडीदारावर हे जीव ओवाळून टाकतात. नात्यात यांना कोणत्याच प्रकारचा दिखावा आवडत नाही. तसेच, हे लोक जोडीदाराची चांगली काळजी घेतात. या जन्मतारखेचे लोक आपल्या अस्तित्वाने आजूबाजूला सकारात्मक वातावरण निर्माण करतात. 

हेही वाचा :                                                              

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Astrology : आज बुधादित्य योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; मिथुनसह 'या' 5 राशींच्या करिअरला मिळणार नवी दिशा