New Year 2025 Wishes In Marathi : डिसेंबर महिना येताच लोक थर्टी फर्स्टची वाट पाहत असतात. या दिवशी सारं जग जल्लोषात व्यस्त असतं. एकदा काय घड्याळात रात्रीचे 12 वाजले की प्रत्येकजण एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षाची अल्हाददायक सुरुवात करतो. 1 जानेवारीला प्रत्येकजण जवळच्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश पाठवत असतो. तुम्ही देखील या दिवशी हे काही हटके शुभेच्छा संदेश (New Year 2025 Wishes In Marathi) तुमच्या प्रिय व्यक्तींना पाठवू शकता आणि दिवसाचा आनंद वाढवू शकता. व्हॉट्सअप स्टेटस आणि सोशल मिडिया कॅप्शनमध्ये देखील तुम्ही हे शुभेच्छा संदेश वापरू शकता.

Continues below advertisement

नवीन वर्ष 2025 शुभेच्छा संदेश (New Year 2025 Wishes In Marathi)

तुमच्या या मैत्रीची साथयापुढेही अशीच कायम असू द्या..नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपूया..येणाऱ्या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा!

भिजलेली आसवे झेलून घेसुख-दुःख झोळीत साठवून घेआता उधळ हे सारे आकाशीनववर्षाचा आनंद भरभरून घेनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Continues below advertisement

येवो समृद्धि अंगणी,वाढो आनंद जीवनी,तुम्हासाठी या शुभेच्छा,नववर्षाच्या या शुभदिनी..!नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!

इडा, पिडा टळू दे आणि नवीन वर्षातमाझ्या मित्रांना काय हवं ते मिळू देनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नवे स्वप्न, नवे वारे,नव्या आशा घेऊन आलेत तारे,जग जिंकायचं आहे आता2025 मध्ये करा यशस्वी पाऊलभारे!

दाखवून गत वर्षाला पाठचाले भविष्याची वाटकरुन नव्या नवरीसारखा थाटआली ही सोनेरी पहाट!!नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुम्हाला येणारे 12 महिने सुख मिळो,52 आठवडे यश आणि365 दिवस मजेदार जावोत,नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! पुन्हा नववर्षाचे स्वागत करूयागतवर्षाची गोळाबेरीज करूयाचांगले तेवढे जवळ ठेऊनवाईट वजा करूयानवे संकल्प, नव्या आशा पुन्हा पल्लवित करूयानवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा!

तुमच्या कुटुंबासाठी 2025 हे वर्ष खास असोसंपूर्ण घर आनंदाने नांदत राहोतुमच्या प्रगतीसाठी नवी दारं उघडोआयुष्याचा प्रत्येक टप्पा यशस्वी ठरो.नववर्षाभिनंदन!

हे वर्ष सर्वांना सुखाचे-समृद्धीचे आणि भरभराटीचे जावोनवीन वर्षाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

पाकळी पाकळी भिजावी,अलवार त्या दवाने ..फुलांचेही व्हावे गाणेअसे जावो वर्ष नवे!नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!Happy New Year 2025!

गेलेली वर्षे विसराया नवीन वर्षाचा स्वीकार करामाथा टेकून देवाला प्रार्थना करूया…या वर्षी तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होवोत.नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

हेही वाचा:

Astrology Yog 2025 : मंगळ-चंद्रामुळे जुळून येणार 'धन योग'; 1 जानेवारीपासून 'या' 3 राशींचं पालटणार नशीब, हातात येणार पैसा