New Year 2024 : नवीन वर्ष सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. 2023 अगदी काही दिवसांत संपणार आहे. सोमवारपासून नवीन वर्षाची, म्हणजेच 2024 ची (New Year 2024) सुरुवात होत आहे. प्रत्येकजण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहे. अशा परिस्थितीत, आठवड्याचे सातही दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतात. पण इतर दिवसांच्या तुलनेत सोमवार काही खास असतो. सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे हे अगदी सर्वांनाच माहीत आहे. अशा स्थितीत शंकराला जल अर्पण करून नवीन वर्षाची शुभ सुरुवात करता येते.


सुख-समुद्धीसाठी करा हा उपाय


असं म्हणतात की, भगवान शिव किंवा भगवान शंकर हा एकमेव देव आहे जो अत्यंत दयाळू आणि कृपाळू आहे. भक्तांच्या खऱ्या भक्तीने महादेव प्रसन्न होऊ शकतात. नियमित एक कलश पाणी अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होऊ शकतात आणि त्यांचे आशीर्वाद तुम्ही मिळवू शकतात. महादेवाला जलाभिषेक करून नवीन वर्षाची सुरुवात केल्यास तुम्हाला शुभ फळ प्राप्त होईल.


जलाभिषेकाचा शुभ मुहूर्त


ज्योतिषशास्त्रानुसार, 1 जानेवारी 2024 रोजी जलाभिषेकचा शुभ मुहूर्त सकाळी 6:33 पासून सुरू होईल आणि सकाळी 7:56 पर्यंत राहील. योग्य वेळी भगवान शंकराला जल अर्पण करणे लाभदायक ठरेल, यामुळे नवीन वर्षाची सुरुवात चांगली होईल. यासोबतच या दिवशी भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करायला विसरू नका. 


शंकराला अर्पण करा या वस्तू


भगवान शंकराला बेलपत्र खूप आवडतं, त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी महादेवाला बेलपत्र अर्पण करायला विसरू नका. भगवान शंकराला बेलपत्र अर्पण केल्याने त्यांचा आशीर्वाद मिळतो, यामुळे तुमच्या आयुष्यातील समस्या क्षणार्धात दूर होतील. याशिवाय कोणत्याही पांढऱ्या रंगाची वस्तूही भगवान शंकराला अर्पण केली जाऊ शकते. 


दानधर्माने करा नवीन वर्षाची सुरुवात


नवीन वर्षाची सुरुवात परोपकाराने, दान-धर्माने केलेली चांगली. अशा परिस्थितीत, तुम्ही सोमवारी दही, पांढरे कपडे, साखर, दूध इत्यादी दान करू शकता. थंडीपासून बचाव करण्यासाठी हिवाळ्यात पांढऱ्या रंगाचे उबदार कपडे गरिबांना दान करता येतात. या दिवशी भगवान शिवाच्या मंत्रांचा जप केल्याने शुभ फल प्राप्त होते. शिव चालिसाचे 108 वेळा सतत पठण केल्याने तुम्हाला भगवान शंकराची विशेष कृपा प्राप्त होईल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shani Dev : नवीन वर्षात शनि 3 वेळा बदलणार आपली चाल; 'या' राशींना बक्कळ लाभ, होणार धनवर्षाव