New Year 2024: नववर्ष 2024 (New Year 2024) लवकरच सुरू होणार आहे. नवीन वर्ष नव्या अपेक्षा घेऊन येत आहे. येणारं वर्ष आपल्या आयुष्यात सुख-समृद्धी घेऊन येवो हीच प्रत्येकाची इच्छा असते. नवीन वर्षात लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी अनेक उपाय केले जातात. नवीन वर्षाच्या आधी लोक आपल्या घरात लक्ष्मीच्या आगमनासाठी विशेष काळजी घेतात.
असं मानलं जातं की, ज्या घरात अस्वच्छता किंवा कचरा आहे, त्या घरात लक्ष्मी कधीच येत नाही. घरामध्ये अशा काही गोष्टी असतात, ज्यामुळे लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत नाही. त्यामुळे 2024 वर्ष सुरू होण्यापूर्वी काही गोष्टी घरातून काढून टाका.
2024 पूर्वी या गोष्टी घरातून काढून टाका
- तुमच्या घरात एखादं तुटलेलं किंवा बंद पडलेलं घड्याळ असेल तर, नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी ते घरातून काढून टाका.
- वास्तूनुसार, घरात बंद घड्याळ ठेवणं अशुभ मानलं जातं.
- नवीन वर्षाची सुरुवात शुभ गोष्टींनी करावी, यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो.
- जर तुमच्या घरात तुटलेला टेबल, सोफा किंवा खुर्ची असेल तर, नवीन वर्ष येण्यापूर्वी या तुटलेल्या फर्निचरच्या वस्तू घरातून काढून टाका. असं मानलं जातं की, घरात तुटलेलं फर्निचर जास्त काळ ठेवणं अशुभ असतं आणि यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा संचारते. म्हणून, घरातील फर्निचर नेहमी सुस्थितीत असलं पाहिजे.
- जर घरात जुनी तुटलेली भांडी असतील तर नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी ती घरातून काढून टाका. तुटलेली भांडी कधीही घरात ठेवू नये. तुटलेली भांडी घरात ठेवणं अशुभ मानलं जातं आणि यामुळे घरात लक्ष्मी वास करत नाही.
- देवाची तुटलेली मूर्ती किंवा खराब झालेले फोटो कधीही घरात ठेवू नयेत. घरात देवांच्या तुटलेल्या मूर्ती किंवा खराब झालेले फोटो ठेवणं अशुभ मानलं जातं. त्यामुळे नववर्षापूर्वी ते विसर्जित करुन घरात देवाची नवीन मूर्ती बसवावी.
- तुमच्या घरातील खिडकी किंवा दाराची काच तुटली असेल तर ती लगेच काढून टाका. घरात कोणत्याही प्रकारची तुटलेली काच ठेवणं अत्यंत अशुभ मानलं जातं. या गोष्टी घरात नकारात्मक ऊर्जा वाढवतात.
- घरातील इलेक्ट्रिक स्वीच बोर्ड, बल्ब, ट्यूबलाईट खराब झाले असतील तर नवीन वर्षाच्या आधी बदलून घ्या. या गोष्टी घरात नेहमी चांगल्या स्थितीत असाव्यात. या गोष्टी बिघडल्यामुळे घरात अंधार असतो, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जाही येते.
- 2024 वर्ष येण्यापूर्वी घरातील जुने किंवा तुटलेले बूट आणि चप्पल बाहेर फेकून द्या. या वस्तू घरात ठेवल्याने घरात दारिद्र्य येतं.
- नवीन वर्षाच्या आगमनापूर्वी सर्व तुटलेल्या आणि खराब झालेल्या वस्तू घरातून काढून टाका, जेणेकरून देवी लक्ष्मी घरात वास करू शकेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Budh Vakri 2023 : डिसेंबरचे 15 दिवस 'या' राशीच्या लोकांवर पडणार भारी; बुधची उलटी चाल करणार नुकसान