New Year 2024 Astrology : आता 2024 वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. नवीन वर्ष आनंद घेऊन येवो हीच प्रत्येकाची इच्छा असते. तज्ज्ञांच्या मते, नवीन वर्ष 2024 खूप प्रभावशाली ठरू शकते, कारण पहिल्याच दिवशी विशेष राजयोग तयार होत आहे. 2024 वर्षाची सुरुवात अतिशय शुभ योगायोगाने होत आहे. या दिवशी 5 दुर्मिळ योगांचा लाभही मिळेल. 1 जानेवारी 2024 या वर्षाच्या पहिल्या दिवसाचे उपाय, शुभ योग जाणून घ्या.


1 जानेवारी 2024 हा दिवस आनंद, समृद्धी आणि संपत्तीचा दिवस असेल. अशा परिस्थितीत वर्षाच्या पहिल्या दिवशी विशेष पूजा केल्याने व्यक्तीला अपार संपत्तीसह पद आणि प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते.


1 जानेवारी 2024 पंचांग 


हिंदू महिना - मार्गशीर्ष
तिथी - पंचमी
पक्ष - कृष्ण
वार - सोमवार
नक्षत्र - मघा
चंद्र चिन्ह -  सिंह
सूर्य चिन्ह -  धनु
राहुकाल सकाळी 08.04 ते सकाळी 9.31


1 जानेवारी 2024 शुभ योग


नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवार, 1 जानेवारी 2024 रोजी आयुष्मान, आदित्य मंगल योग, गजकेसरी योग आणि लक्ष्मी नारायण योग यांचा संयोग आहे. या 5 शुभ योगांमध्ये नवीन वर्षाची सुरुवात करणे शुभ आणि फलदायी मानले जाते.


लक्ष्मी नारायण योग


शुक्र आणि बुध यांच्या संयोगाने लक्ष्मी नारायण योग तयार होतो. 1 जानेवारी 2024 रोजी शुक्र आणि बुध ग्रह वृश्चिक राशीत असतील, त्यामुळे हा योग तयार होईल. लक्ष्मी नारायण योगामुळे वैवाहिक जीवनात प्रेम आणि संपत्ती वाढते. या योगात केलेले कार्य आरोग्य आणि समृद्धी प्रदान करते.


आदित्य मंगल योग


1 जानेवारी 2024 रोजी सूर्य आणि मंगळ धनु राशीत असतील, या दोन ग्रहांच्या संयोगाने आदित्य मंगल योग तयार होईल. आदित्य मंगल योगाच्या प्रभावामुळे व्यक्तीला कामाच्या ठिकाणी चांगले यश प्राप्त होते. करिअर आकाशाला भिडते.


गजकेसरी योग


1 जानेवारी 2024 रोजी चंद्र सिंह राशीत असेल, तर 29 डिसेंबर रोजी गुरु मेष राशीत असेल. वर्षाच्या सुरुवातीला गुरूची पाचवी दृष्टी सिंह राशीवर पडेल जिथे चंद्राच्या उपस्थितीमुळे गजकेसरी योग तयार होईल. गजकेसरी योग, त्याच्या नावाप्रमाणे, गजा म्हणजेच हत्तीप्रमाणे शक्ती आणि संपत्ती प्रदान करतो. गजकेसरी योगाच्या प्रभावामुळे माणूस सदाचारी आणि ज्ञानी बनतो, प्रत्येक कामात यश प्राप्त करतो, त्याच्याकडे धन, पद आणि पैशाची कमतरता नसते.


आयुष्मान योग


वर्षाच्या पहिल्या दिवशी 1 जानेवारी रोजी पहाटे 03.31 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी 2 जानेवारी 2024 रोजी पहाटे 04.36 वाजेपर्यंत आयुष्मान योग असेल. आयुष्मान योगामध्ये भगवान शिव आणि भगवान गणेशाची साधना केल्याने दीर्घायुष्याचे वरदान मिळते आणि सौभाग्यही प्राप्त होते.


5 वर्षांत प्रथमच सोमवार


5 वर्षांत प्रथमच, नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजेच 1 जानेवारी 2024 रोजी सोमवार पडत आहे. सोमवारपासून नवीन आठवडा सुरू होत आहे. सोमवारी नवीन वर्षाची सुरुवात शुभ आणि आनंद देणारी मानली जाते. अशा स्थितीत जे लोक या दिवशी भोलेनाथाचा अभिषेक करतात त्यांच्यावर वर्षभर भगवान शंकराची कृपा असेल.



1 जानेवारी 2024 साठीचे उपाय


नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी श्रीगणेशाची पूजा करण्यासोबतच शिव आणि विष्णूला अभिषेक करावा. देवी लक्ष्मीला कमलगट्टा अर्पण करा, दक्षिणावर्ती शंख, श्रीयंत्र, चांदीचा हत्ती किंवा तांब्याची सूर्यमूर्ती घरात स्थापित करा. असे मानले जाते की गजकेसरी, लक्ष्मी नारायण योग, आयुष्मान योग आणि आदित्य मंगल योग यांचा संपूर्ण कुटुंबावर शुभ प्रभाव पडतो.


वर्षाच्या पहिल्या दिवशी काय करावे?


नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी 1 जानेवारी 2024 रोजी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून भगवान सूर्याला अर्घ्य अर्पण करावे
ओम ह्रीं ह्रीं सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा.
गणपतीला दुर्वा अर्पण करा. तुळशीला जल अर्पण करा. 
सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्तीसाठी भोलेनाथाला अभिषेक करा. 
ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा
भगवान विष्णूच्या बीज मंत्र 'ओम नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा जप करताना केशर मिसळलेल्या दुधाने स्नान करावे.
अन्न, वस्त्र, गूळ, तीळ, तांबे, गहू आणि शिक्षणाशी संबंधित गोष्टी गरजूंना दान करा.
मध्यरात्री म्हणजेच निशित काल मुहूर्तावर देवी लक्ष्मीची पूजा करा. 
तुपाचा दिवा लावा आणि श्री सूक्ताचे पठण करा.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shani Dev : 2024 मध्ये शनि बनवणार विशेष 'राजयोग'! 3 राशी ठरणार भाग्यशाली, आर्थिक लाभ, करिअर प्रगती, सुखी वैवाहिक जीवन जाणून घ्या