Negative Energy: घरातील वातावरण जेव्हा प्रसन्न असते, तेव्हा तिथे सुख-शांती नांदते. देवी लक्ष्मीचा वास असतो. घरातील सदस्यांनाही यश, सुख-समृद्धी लाभते. घराचे वातावरण सकारात्मक राहिल्यास तेथे भरभराट असते. घरातील सकारात्मक ऊर्जेमुळे कुटुंबातील सदस्यांच्या आयुष्यात प्रगती होते. पण कधी कधी जेव्हा आपण घरी येतो, तेव्हा अचानक विचित्र वाटू लागतं, किंवा सतत अडचणी, समस्या आपली पाठ सोडत नाही. मग तेव्हा तुम्ही समजून जा, काहीतरी नकारात्मक उर्जा तुमच्या घरी नक्की असावी.. जाणून घ्या त्याची लक्षणं..
जर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर...
जर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर तिथे कधीही शांतता येत नाही. ज्या घरात नकारात्मक शक्ती राहतात, त्या घरातील लोकांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांना त्यांच्या कामात यश मिळत नाही. जाणून घेऊया अशी कोणती लक्षणं आहेत, ज्याद्वारे तुम्ही जाणून घेऊ शकता की, तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे किंवा नाही?
घरी येताच विचित्र वाटतं?
असे म्हणतात की घर ही अशी जागा आहे जिथे माणूस गेल्यावर आपले सर्व दुःख आणि वेदना विसरतो. घर हे एकमेव ठिकाण आहे जिथे माणूस शांतपणे राहतो. पण घरी येताच विचित्र वाटत असेल किंवा घरी येताच तुम्हाला दुःख, राग किंवा रडल्यासारखे वाटते. त्यामुळे तुमचे घर नकारात्मक उर्जेने भरलेले आहे हे समजून घ्या.
कुटुंबातील सदस्य सतत आजारी
ज्या घरात कुटुंबातील सदस्य आजारी असतात किंवा अचानक एखादा सदस्य आजारी पडतो आणि उपचार करूनही बरा होत नाही, तर हे देखील नकारात्मक उर्जेचे लक्षण आहे.
घरात कोणीतरी आहे....?
जर तुम्हाला घरात कोणाची उपस्थिती जाणवत असेल. विशेषत: रात्रीच्या वेळी असे वाटते की, कोणीतरी गुपचूप आपल्याला पाहत आहे किंवा कोणाची सावली दिसत आहे. काही अज्ञात हालचाली जाणवत आहेत. ही सर्व लक्षणे तुमच्या घरात नकारात्मक शक्तींचा वावर असल्याचे दर्शवतात.
इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे वारंवार खराब होणे
इलेक्ट्रॉनिक वस्तू वारंवार तुटल्या तर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा असल्याचे सूचित होते. जर अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू अचानक तुटल्या तर ते चांगले लक्षण नाही.
हेही वाचा>>>
Garud Puran: मृत्यूनंतर नरकातील 'या' शिक्षा माहित आहेत? गरुडपुराणात नरकाचे किती प्रकार सांगितलेत? वाईट कृत्य करण्यापूर्वी 10 वेळा विचार करा..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )