Shardiya Navratri 2025: सध्या गणेशोत्सवाचा उत्साह अवघ्या देशभरात दिसून येतोय, त्यानंतर भक्तांना आतुरता असते, ती म्हणजे आई भवानीच्या आगमनाची..हिंदू धर्मात, शारदीय नवरात्रीचा उत्सव अत्यंत शुभ मानला जातो. पौराणिक मान्यतेनुसार, या काळात देवी दुर्गा पृथ्वीवर येते आणि भक्तांना आशीर्वाद देते. शास्त्रांमध्ये देवी कोणत्या दिवशी, कोणत्या वाहनावर येते आणि जाते, त्याचे विशेष संकेत आणि महत्त्व सांगण्यात आले आहे. यामुळे वर्षभर शुभ आणि अशुभ संकेताचे ज्ञान मिळते. 


देवी दुर्गेच्या आगमन आणि प्रस्थानाची स्वारी जाणून घ्या...


हिंदू दिनदर्शिकेनुसार, 2025 या वर्षी शारदीय नवरात्री सोमवार, 22 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि 2 ऑक्टोबर 2025 रोजी विजयादशमीच्या दिवशी समाप्ती होईल. अशात, यंदा देवी दुर्गेच्या आगमन आणि प्रस्थानाची स्वारी काय आहे आणि ती काय संकेत दर्शवते. दरवर्षी ही स्वारी वेगवेगळी असते. शास्त्रांमध्ये यासंबंधित विशेष संकेत देण्यात आले आहेत. या वर्षी शारदीय नवरात्रीत देवी दुर्गेच्या आगमन आणि प्रस्थानाचे संकेत काय आहेत ते जाणून घेऊया.


देवी दुर्गेचे आगमन काय संकेत देते?


शशिसूर्ये गजारूढ़ा, शनिभौमे तुरंगमे।
गुरुशुक्रे च दोलायां बुधे नौका प्रकीर्तिता।।



  • शास्त्रात म्हटल्याप्रमाणे, नवरात्रीच्या सुरुवातीच्या दिवशी देवी दुर्गा जर रविवार किंवा सोमवारी आली तर तिचे वाहन हत्ती असते जे पाऊस आणते, 

  • जर ती शनिवारी किंवा मंगळवारी आली तर राजा आणि सरकारला त्यांच्या पदावरून पायउतार व्हावे लागू शकते, 

  • जर ती गुरुवारी किंवा शुक्रवारी आली तर ती खटोला म्हणजेच खाटेवर येते, जी जीवितहानी आणि रक्तपात दर्शवते, 

  • जर ती बुधवारी आली तर देवी नौकेवर (होडीतून) येते आणि भक्तांना सर्व सिद्धी देते.


देवी दुर्गेचे प्रस्थान काय संकेत देते?


शशिसूर्यदिने यदि सा विजया, महिषा गमनेरूज शोककरा
शनिभौमे यदि सा विजया चरणायुधयानकरी विकला 
बुधशुक्रे यदि सा विजया  गजवाहनगा शुभवृष्टिकरा 
सुरराजगुरौ यदि सा विजया नरवाहनगा शुभसौख्यकरा



  • शास्त्रात म्हटल्याप्रमाणे, जर विजयादशमी रविवारी किंवा सोमवारी आली तर, देवी दुर्गा म्हशीवर बसून निघते जी दुःख आणते. 

  • जर विजयादशमी शनिवारी किंवा मंगळवारी आली तर, देवी कोंबडा वाहनावर बसून जाते,

  • ज्यामुळे जनतेला त्रास आणि विनाश अनुभवायला मिळू शकतो. 

  • जर विजयादशमी बुधवार किंवा शुक्रवारी आली तर, देवी दुर्गा हत्तीवर बसून जाते. यावेळी, देवी शुभ संकेत देते, उत्तम पाऊस होतो.

  • जर विजयादशमी गुरुवारी आली तर, ती मानवावर बसून निघते जी सुख आणि शांती देते.


हेही वाचा :           


Gauri Avahana 2025: आज सोनपावलांनी गौरी येणार, सोबत 'या' 5 राशींचे नशीबही उजळणार! घरात सुख, शांती, भरभराट होणार, तुमची रास?


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)