Navratri 2022 : नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा देवीच्या (Goddess Durga) विविध रूपांची पूजा केली जाते. देवीच्या पुजेचे वेगळे आणि विशेष महत्त्व मानले जाते. हिंदू पंचागानुसार, शारदीय नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. मातेचे हे रूप युद्धाची देवता म्हणून मानले जाते. मान्यतेनुसार, दैत्य आणि राक्षसांचा नाश करण्यासाठी देवी दुर्गेने हा अवतार घेतला. अशी मान्यता आहे की, चंद्रघंटा देवीची उपासना करून भक्त जीवनात निर्भय बनतात.


...तर त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात


शत्रूंवर विजय मिळवायचा असेल तर भक्ताने चंद्रघंटा देवीची पूजा करावी. जे देवीचे स्मरण मनापासून करतात आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. त्यांना आई कधीच निराश करत नाही. आज तुम्ही काही मंत्रांचाही जप करू शकता. 


देवी चंद्रघण्टाचा प्रभावशाली मंत्र


ॐ देवी चन्द्रघण्टायै नमः॥


प्रार्थना मंत्र


पिण्डज प्रवरारूढा चण्डकोपास्त्रकैर्युता।
प्रसादं तनुते मह्यम् चन्द्रघण्टेति विश्रुता॥


स्तुति


या देवी सर्वभू‍तेषु माँ चन्द्रघण्टा रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥


ध्यान मंत्र


वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखराम्।
सिंहारूढा चन्द्रघण्टा यशस्विनीम्॥
मणिपुर स्थिताम् तृतीय दुर्गा त्रिनेत्राम्।
खङ्ग, गदा, त्रिशूल, चापशर, पद्म कमण्डलु माला वराभीतकराम्॥
पटाम्बर परिधानां मृदुहास्या नानालङ्कार भूषिताम्।
मञ्जीर, हार, केयूर, किङ्किणि, रत्नकुण्डल मण्डिताम॥
प्रफुल्ल वन्दना बिबाधारा कान्त कपोलाम् तुगम् कुचाम्।
कमनीयां लावण्यां क्षीणकटि नितम्बनीम्॥



चंद्रघंटा देवीच्या मंत्राचा जप करण्याचे फायदे


चंद्रघंटा मातेच्या कृपेने साधकाची सर्व पापे आणि अडथळे नष्ट होतात. त्यांची उपासना सदैव फलदायी असते. आई भक्तांचे दुःख लवकर दूर करते. त्याचा उपासक सिंहासारखा पराक्रमी आणि निर्भय होतो. मातेच्या घंटाचा नाद नेहमी त्याच्या भक्तांचे वाईट प्रवृत्तीपासून रक्षण करतो.


चंद्रघंटा देवीची पूजा पद्धत
या दिवशी देवीला लाल वस्त्र परिधान करून देवी चंद्रघंटाची पूजा करणे उत्तम मानले जाते. मातेला लाल फुले, रक्तचंदन आणि लाल वस्त्र अर्पण करावे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


महत्वाच्या बातम्या