Navpancham Yog 2025 : वैदिक शास्त्रानुसार, सूर्य (Sun) आणि शनिचा (Shani) नवपंचम योग 17 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजून 23 मिनिटांनी जुळून येणार आहे. जेव्हा सूर्य तूळ राशीत नीच होतील. तसेच, शनी मीन राशीत असणार तेव्हा दुर्लभ त्रिकोण संयोग भाग्य नावाचा योग जुळून येणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. तसेच, तुमच्या आयुष्याला टर्निंग पॉईंट मिळणार आहे. या शुभ योगामुळे कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या सातव्या चरणात सूर्य असणार आहे. या काळात तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद दिसून येईल. कुटुंबियांबरोबर तुमचा वेळ आनंदात जाईल. तसेच, जर तुम्ही नोकरी बदलीचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी फार चांगला असणार आहे. लवकरच प्रवासाला जाण्याचे योग जुळून येतील.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीसाठी हा काळ फार आनंददायी असणार आहे. जर तुम्ही नवीन प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. घरगुती वादापासून सुटका होईल. तुमच्या आरोग्यात चांगली सुधारणा झालेली दिसेल. परदेशात जाण्याचे योग लवकरच जुळून येतील.
सिंह रास (Leo Horoscope)
सूर्य या राशीच्या तिसऱ्या चरणात आहे. त्यामुळे तुमच्या साहस, पराक्रमात वाढ झालेली दिसेल. एखादं नवीन प्रोजेक्ट तुमच्या हाती लागण्याची शक्यता आहे. वडिलोत्पार्जित संपत्तीतून तुम्हाला लाभ मिळेल. तसेच, तुमच्यातील आत्मविश्वास वाढलेला दिसेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
या राशीच्या बाराव्या चरणाचा स्वामी ग्रह सूर्य आहे. त्यामुळे या काळात तुमच्या खर्चात वाढ झालेली दिसेल. बिझनेसमध्ये तुम्हाला अनेक संधी मिळतील. तुमच्यातील नातेसंबंध अधिक घट्ट होताना दिसतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. आरोग्यात चांगली सुधारणा झालेली दिसेल.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)