Kendra Trikon Yog 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक अंतराने संक्रमण करतात. यामुळे अनेक शुभ आणि राजयोग (Rajyog)निर्माण होतात. गुरु ग्रह बृहस्पती तब्बल 12 वर्षांनी आपल्या उच्च राशीत म्हणजेच कर्क राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे हंस महापुरुष राजयोग आणि केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण होणार आहे. यामुळे काही राशींचा सुवर्णकाळ सुरु होऊ शकतो. त्याचबरोबर यामुळे तुमच्या पदप्रतिष्ठेत वाढ होण्याची शक्यता आहे. या लकी राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी केंद्र त्रिकोण राजयोग फार लाभदयाक ठरणार आहे. कारण हा राजयोग तुमच्या लग्न भावात जुळून येणार आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तुमच्या मान-सन्मानात चांगली वाढ झालेली दिसेल. नवीन लोकांशी भेटीगाठी होतील. तुम्ही केलेल्या प्रयत्नांना चांगलं यश मिळेल. तसेच, नशिबाची साथ तुमच्याबरोबर असणार आहे. प्रवासाला जाण्याचे शुभ योग या काळात निर्माण होतील.
तूळ रास (Libra Horoscope)
केंद्र त्रिकोण राजयोग जुळून आल्याने तूळ राशीसाठी हा काळ भाग्यशाली असणार आहे. हा राजयोग तुमच्या कर्म भावात जुळून येणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रगतीच्या अनेक संधी निर्माण झालेल्या दिसतील. या काळात एखादं नवीन प्रोजेक्ट तुमच्या हाती लागू शकते. कोणताही महत्त्वाचा निर्णय योग्य वेळी घ्या. व्यवसायातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल.
कन्या रास (Virgo Horoscope)
केंद्र त्रिकोण राजयोगामुळे तुमच्या उत्पन्न आणि गुंतवणुकीत चांगला लाभ मिळेल. या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसेल. जबाबदाऱ्या अनेक वाढलेल्या दिसतील. तुमच्या मेहनतीचे तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. गुंतवणुकीचे अनेक मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. तसेच, शेअर बाजार, सट्टा, लॉटरीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. योग्य वेळी योग्य निर्णय घ्या.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
