Navapancham Yog 2025 : वैदिक शास्त्रानुसार, 17 नोव्हेंबर 2025 रोजी म्हणजेच उद्या ग्रहांचा राजा आणि पिता म्हटला जाणारा असा सूर्य ग्रह (Sun) आणि बृहस्पती ग्रह एकमेकांच्या 120 डिग्री अंतरावर असणार आहेत. सूर्य आणि गुरु ग्रहाच्या युतीने नवपंचम राजयोग (Navapancham Yog) निर्माण होणार आहे. द्रिक पंचांगानुसार, उद्याच्या दिवशी सकाळी 10 वाजून 35 मिनिटांनी सूर्य आणि गुरु ग्रह 120 डिग्रीच्या स्थितीवर असतील. ज्यामुळे नवपंचम योग निर्माण होणार आहे. 

Continues below advertisement

शास्त्रानुसार, गुरु ग्रह भाग्य, धर्म, ज्ञानाचा कारक ग्रह मानतात. जेव्हा या ग्रहाची सूर्याबरोबर युती होते तेव्हा जीवनात प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. उद्या निर्माण होणारा नवपंचम योग चार राशींसाठी सकारात्मक ठरणार आहे. या काळात तुमचं भाग्य उजळण्याची शक्यता आहे. या योगामुळे कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात. 

मकर रास (Capricorn Horoscope)

सूर्य-गुरुच्या युतीने नवपंचम योग निर्माण होऊन मकर राशीच्या लोकांना चांगला आर्थिक लाभ मिळणार आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. मात्र, तुमच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. 

Continues below advertisement

वृषभ रास (Taurus Horoscope)

नवपंचम योग वृषभ राशीसाठी नवीन साहस आणि ऊर्जा देणारा असणार आहे. या काळात तुमच्यातील प्रेम संबंध टिकून राहतील. मुलांकडून तुम्हाला शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. मात्र, तुमचा हा प्रवास सुखकर होईल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

सूर्य आणि गुरु ग्रहाच्या युतीने नवपंचम योग निर्माण होणार आहे. या काळात कर्क राशीच्या जीवनात अनेक चांगले बदल घडून येतील. धार्मिक यात्रेला जाण्याचा देखील शुभ योग जुळून येणार आहे. एखाद्या सरकारी योजनेचा तुम्ही लाभ घ्या. तसेच नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल.

मीन रास (Pisces Horoscope)

नवपंचम योग मीन राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरणार आहे. या काळात मित्रांच्या सहकार्याने तुम्ही तुमची अनेक कामे पूर्ण करु शकता. समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. तसेच, दिवसाच्या शेवटी तुम्हाला एखादी शुभवार्ता नक्की मिळेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :         

Grah Gochar 2026 : गुरु, शनि, राहू आणि केतूसह 'या' ग्रहांचं संक्रमण; वर्षाच्या सुरुवातीलाच 'या' राशींना फुटणार घाम, व्यवसाय आणि नोकरीवर होणार परिणाम?