Grah Gochar 2026 : लवकरच नवीन वर्षाची (New Year 2026) सुरुवात होणार आहे. 2026 या वर्षात शनि (Shani Dev), गुरु, राहू (Rahu) आणि केतू ग्रह आपल्या चालीत बदल करणार आहेत. कर्मफळदाता शनि नवीन वर्षात मीन राशीत विराजमान असेल. तर, राहू ग्रह 2025 वर्षाच्या शेवटी राहू ग्रह मकर राशीत प्रवेश करणार आहे. गुरु ग्रह कर्क राशीत आणि सिंह राशीत संक्रमण करणार आहे. तर, केतू (Ketu) ग्रह सध्या सिंह राशीत आहे. मात्र, वर्ष संपण्याआधी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षात ग्रहांच्या या संक्रमणाने अनेक राशींवर खास परिणाम होणार आहे. काही राशींसाठी हा काळ फार शुभ तर काही राशींसाठी अशुभ ठरणार आहे. चला तर मग, 2026 मध्ये शनि, गुरु, राहू आणि केतूचं संक्रमण कोणत्या राशींच्या अडचणी वाढवणार आहे ते जाणून घेऊयात. 

Continues below advertisement

सिंह रास (Leo Horoscope)

2026 मध्ये शनि, गुरु, राहू आणि केतू ग्रहाचं संक्रमण सिंह राशीसाठी शुभकारक ठरणार नाही. कारण या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत अनेक चढ-उतार निर्माण झालेले दिसतील. तुम्हाला पैशांची कमतरता भासू शकते. तसेच, या कालावधीत तुम्हाला फार नकारात्मकही वाटण्याची शक्यता आहे. पार्टनरबरोबर तुमचे वाद टोकाला जातील. आरोग्याच्या बाबतीतही दुर्लक्षपणा दिसेल. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

नवीन वर्षात शनि, गुरु, राहू आणि केतू ग्रहाचं संक्रमण धनु राशीसाठी फार आव्हानात्मक ठरणार आहे. या काळात तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागेल. आयुष्यात एकामागोमाग अनेक संकटं येतील. या संकटांचा तुम्हाला सामना करावा लागेल. तसेच, तुमची ठरवलेली कामे वेळेत पू्र्ण न झाल्यामुळे तुमची चिडचिडही होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीत कोणताच हलगर्जीपणा करु नका. 

Continues below advertisement

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी नव्या वर्षात शनि, गुरु, राहू आणि केतू ग्रहाच्या होणाऱ्या संक्रमणामुळे तुम्हाला अनेक संकटांना सामोरं जावं लागणार आहे. या काळात तुमच्या करिअर आणि नोकरीवरही परिणाम दिसून येईल. नात्यात दुरावा निर्माण झालेला दिसेल. तसेच, तुमच्या खर्चात अनावश्यक वाढ होईल. कोणत्याही गोष्टीचा तुम्हाला विनाकारण मनस्ताप झालेला दिसेल. तसेच, मुलांच्या शिक्षणावरही परिणाम दिसून येईल. त्यामुळे वेळीच काळजी घेणं गरजेचं आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हे ही वाचा : 

Horoscope Today 16 November 2025 : आज रविवारच्या दिवशी 5 राशींच्या हातात खेळेल पैसा; लक्ष्मी चालून येईल हातात, वाचा 12 राशींचे आजचे राशीभविष्य