मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) लाभार्थी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. योजनेचा मासिक हप्ता न थांबता सुरू राहावा यासाठी ई-केवायसी (E-KYC) करणे बंधनकारक असून, ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आता फक्त १८ नोव्हेंबर पर्यंतची मुदत आहे. केवायसी न करणाऱ्या महिलांना पुढील हप्ता मिळणार नाही, त्यामुळे राज्यातील सर्व पात्र 'लाडक्या बहिणीं'नी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ई-केवायसीची अंतिम मुदत १८ नोव्हेंबर
अंतिम तारीख: ई-केवायसी पूर्ण करण्याची शेवटची तारीख १८ नोव्हेंबर आहे.
नियम: ई-केवायसी न केल्यास योजनेचे पैसे (₹१५००) मिळणे थांबेल.
लाभार्थी महिला https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या सरकारी अधिकृत वेबसाइटवर जाऊन स्वतःच्या मोबाईलद्वारे घरबसल्या केवायसी पूर्ण करू शकतात. यासाठी पात्र महिलेचा आधार कार्ड तसेच पतीचा किंवा वडिलांचा आधार कार्ड वापरून केवायसी पूर्ण करायची आहे.
विधवा आणि निराधार महिलांसाठी मोठी अपडेट
ई-केवायसी करताना ज्या लाडक्या बहिणी विधवा आहेत किंवा ज्यांचे वडील हयात नाहीत, त्यांना पती किंवा वडिलांचा आधार कार्ड जोडताना अडचणी येत होत्या. या समस्येची दखल घेत महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी माहिती दिली आहे.
अतिवृष्टीग्रस्त भागातील महिलांना मुदतवाढ?
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक महिलांची आवश्यक कागदपत्रे गहाळ झाली आहेत. यामुळे केवायसी करताना त्यांना मोठा अडथळा येत आहे.
याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, "मराठवाडा, सोलापूर, धाराशीव या अतिवृष्टीग्रस्त भागातील महिलांसाठी केवायसी प्रक्रियेत मुदतवाढ देण्याबाबत विचार सुरू आहे." त्यांनी आश्वासन दिले की, "कुठलाही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही, याची आम्ही दक्षता घेऊ."
अंतिम आवाहन: १८ नोव्हेंबर ही अंतिम मुदत लक्षात घेऊन, पात्र महिलांनी तातडीने आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी.