Nag Panchami 2025: यंदा नागपंचमीचा पवित्र सण मंगळवार 29 जुलै 2025, रोजी साजरा केला जाईल. धार्मिक श्रद्धेनुसार, या दिवशी नाग देवतेची पूजा केल्याने भगवान शिवाचे विशेष आशीर्वाद मिळतात. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला साजरा होणारा हा सण शिवभक्तांसाठी खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी शिवलिंगावर पाणी अर्पण करून आणि नाग देवतेची पूजा केल्याने जीवनात शांती, समृद्धी आणि संकटांपासून मुक्तता मिळते. अशा शुभ प्रसंगी, तुम्हीही मराठीतील काही सुंदर शुभेच्छा संदेश, कोट्स आणि स्टेटस तुमच्या कुटुंबाला, मित्रांना आणि प्रियजनांना पाठवू शकता.

तुमच्या प्रियजनांना या सुंदर आणि हटके शुभेच्छा पाठवा.

नागपंचमीचा सण श्रद्धा आणि शिवभक्तीशी संबंधित आहे. या दिवशी नाग देवतेची पूजा केल्याने जीवनातील त्रास दूर होतात आणि सुख आणि समृद्धीचा मार्ग मोकळा होतो. या शुभ प्रसंगी, तुमच्या प्रियजनांना या सुंदर आणि शुभ शुभेच्छा पाठवा.

नागपंचमी 2025 शुभेच्छा संदेश

वसंत ऋतूच्या आगमनी, कोकिळा गाई गोड गाणीनागपंचमीच्या शुभदिनी, सुख-समृद्धी मिळो सर्वांना जीवनीनागपंचमीच्या शुभेच्छा!

रुसला पर्जन्यराजा, मदत ना मिळे कोणाची,परी तूच खरा मित्र, पाठ राखीतो बळीराजाची… नागपंचमीच्या शुभेच्छा!

देवांचा देव महादेवाला जो प्रिय, भगवान विष्णूचे जो आहे सिंहासन, ज्याने पृथ्वीला उंच केले अशा नागदेवालामाझा त्रिवार नमस्कार… नागपंचमीच्या शुभेच्छा!

भगवान शंकराच्या गळ्यात सापाचा हार आहे… नागपंचमी शिवभक्तांसाठी खास उत्सव आहे. नागपंचमीच्या शुभेच्छा!

नागपंममीचा सण आला, पर्जन्यराजाला  आनंद झालान्हाहून निघाली वसुधंरा, घेतला हाती हिरवा शेला… नागपंचमीच्या शुभेच्छा!

पवित्र महिन्यातील पहिला सण नागपंचमी… नागदेवतेची कृपा तुमच्यावर सदैव राहो… नागपंचमीच्या शुभेच्छा!

निसर्गाच्या बांधीलकीतून नागपंचमीचा सण आला,शेतकऱ्याचा मित्र तो सच्चा,शिवाच्या गळ्यातील हार झाला.नागपंचमीच्या शुभेच्छा!

वसंत ऋतूच्या आगमनी,कोकिळ गाई गोड गाणीनागपंचमीच्या शुभदिनी,सुख-समृद्धी मिळो सर्वांना

भगवान शंकराच्या गळ्यात सापाचा हार आहेनागपंचमी शिवभक्तांसाठी खास उत्सव आहे. नागपंचमीच्या शुभेच्छा.

नागपंममीचा सण आला,पर्जन्यराजाला आनंद झाला न्हाहून निघाली वसुधंरा,घेतला हाती हिरवा शेला… नागपंचमीच्या शुभेच्छा.

दूध लाह्या वाहू नागोबाला,चल गं सखे जाऊ वारूळाला… नागपंचमीच्या भक्तिमय शुभेच्छा.

नागोबाचे रक्षण करू हीच खरी नागपंचमी… श्रावणातील पहिल्या सणाच्याहार्दिक शुभेच्छा! 

हेही वाचा :           

Nag Panchami 2025: यंदा नागपंचमीला 1 नाही, तर 3 जबरदस्त योग बनतायत! 'या' 3 राशींचं होणार चांगभलं, वाईट दिवस संपलेच म्हणून समजा...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)