Nag Panchami 2025: 2025 वर्षात नाग पंचमी 29 जुलै म्हणजे उद्या आहे. हिंदू धर्मात नागपंचमी या सणाला मोठे महत्त्व आहे, सध्या श्रावण महिना सुरू झाला आहे, भगवान शिव यांचा आवडता महिना असून तो अत्यंत पवित्र मानला जातो. नागपंचमी ही श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी केली जाते. एकंदरीतच लोकांना सापांची भीती वाटत असली तरी, वर्षात एक असा दिवस येतो, जेव्हा सापांना घाबरण्याऐवजी त्यांची पूजा विधीपूर्वक केली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, नागपंचमीच्या दिवशी ग्रहांच्या विशेष हालचालीमुळे अनेक योगायोग घडणार आहेत. यंदा नागपंचमीला एक, दोन नाही तर तब्बल 3 योगायोग घडतायत. ज्यामुळे 3 राशींच्या लोकांचं नशीब पालटण्याची शक्यता आहे. 

यंदा नागपंचमीला 3 जबरदस्त योग बनतायत!

हिंदू धर्मात सापांना देवांचा दर्जा देण्यात आला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, यंदाची नागपंचमी खूप खास मानली जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, नागपंचमीला रवि योग, सौभाग्य योग, शिव योग आणि अभिजीत मुहूर्त घडणार आहेत. ज्यामुळे 3 राशींचे अच्छे दिन येणार आहेत. या लोकांना विविध संकटातून मुक्तता मिळणार आहे, कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी?

'या' 3 राशींचं होणार चांगभलं

मेष (Aries)

ज्योतिषशास्त्रानुसार, नागपंचमीच्या निमित्ताने मेष राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या दीर्घकालीन समस्या सोडवता येतील, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि ते त्यांच्या आयुष्यात पुढे जाण्यास तयार होतील.

धनु (Sagittarius)

नाग पंचमीच्या दिवशी धनु राशीच्या लोकांना आर्थिक आघाडीवर सकारात्मक परिणाम मिळतील. तुम्ही नवीन प्रकल्प सुरू करण्याचा विचार करू शकता, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नवीन उंची येईल. आरोग्यातही सुधारणा होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे ते त्यांचे ध्येय साध्य करू शकतील.

मकर (Capricorn)

नागपंचमीच्या दिवशी मकर राशीच्या लोकांना व्यवसायात यश मिळेल. अनावश्यक वाद टाळा आणि तुमची मानसिक शांती राखा, ज्यामुळे ते त्यांच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करू शकतील आणि त्यांच्या करिअरमध्ये प्रगती करू शकतील.

कुंभ (Aquarius)

तणावमुक्त जीवनाकडे कुंभ राशीच्या लोकांची मानसिक शांती वाढत्या प्रमाणात सुधारेल. आर्थिक स्थिरता राहील आणि करिअरमध्ये सकारात्मक बदल होण्याची शक्यता वाढेल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या व्यावसायिक जीवनात नवीन उंची गाठू शकाल.

हेही वाचा :           

Mahalakshmi Rajyog: पहिलाच श्रावणी सोमवार 'या' 3 राशींचं आयु्ष्य बदलेल, पॉवरफुल 'महालक्ष्मी राजयोग' बनतोय, धनलाभाचे योग, बक्कळ पैसा येईल

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)