Nag Panchami 2024 : हिंदू धर्म मान्यतेनुसार, नागराजाला देवतेच्या रुपात मानले जाते. वर्षभरात असा एक सण येतो ज्या दिवशी नागराजाची मनोभावे पूजा केली जाते. त्यानुसार, श्रावण (Shravan) महिन्यातील शुक्ल पक्षच्या पंचमी तिथीला नागपंचमीचा (Nag Panchami) सण साजरा केला जातो. यंदा हा सण 09 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने तुम्ही काही हटके शुभेच्छा संदेश पाठवून तुमच्या मित्र-मंडळींना, प्रियजनांना शुभेच्छा देऊ शकता.


नागपंचमीनिमित्त आपल्या प्रियजनांना द्या हटके शुभेच्छा! (Nag Panchami Wishes 2024)


1. वसंत ऋतूच्या आगमनी, कोकिळा गाई मंजुळ गाणी
नागपंचमीच्या शुभदिनी, सुख-समृद्धी नांदो तुमच्या जीवनी...


नागपंचमीच्या शुभेच्छा!


 


2. मान ठेवूया नाग राजाचा, पूजा करून शिवशंकर भोले नाथाचा… नागपंचमीच्या शुभेच्छा!


 


3. दूध लाह्या वाहू नागोबाला, चल गं सखे जाऊ वारूळाला… नागपंचमीच्या भक्तिमय शुभेच्छा!



4. शिवशंभूचा हार गळ्यातील तू भूमीचा स्वामी,
आज तुझा सण आला आहे.. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!



5. निसर्गाच्या बांधीलकीतून नागपंचमीचा सण निर्माण झाला, 
शेतकऱ्याचा मित्र तो सच्चा, शिवाच्या गळ्यातील हार झाला
नागपंचमीच्या  हार्दिक शुभेच्छा



6. समुद्र मंथनाने कळली जगास ज्यांची महती
अशा नागदेवांना सारे जग वंदती…नागपंचमीच्या शुभेच्छा..!



7. नागपंचमीच्या दिवशी देवाकडे एकच प्रार्थना,
तुमच्यावर ईश्वराची सदैव कृपा असू दे,
तुमचे आयुष्य आनंदी आणि मंगलदायी होवो,
नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा!!



8. निसर्गाच्या बांधीलकीतून निर्माण झाला नागपंचमीचा सण,
शेतकरी आपल्या मित्राचे उतरवतो या निमित्ताने ऋण
नागपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!


 


9. नागपंममीचा सण आला,
पर्जन्यराजाला आनंद झाला,
न्हाहून निघाली वसुधंरा,
घेतला हाती हिरवा शेला,
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!



10. बळीराजाचा हा कैवारी
नागराजाची मूर्ती पुजूया घरी
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Nag Panchami 2024 : श्रावणमासातील पहिला सण नागपंचमीचा! या निमित्त आपल्या प्रियजनांना द्या खास मराठमोठ्या शुभेच्छा...