Moon Transit 2025: आज 19 मार्च रंगपंचमीचा दिवस साजरा होत आहे. होळीच्या पाचव्या दिवशी हा सण साजरा केला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार आजची दुपार अनेक राशींसाठी महत्त्वाची ठरणार आहे. या दिवशी चंद्र आपली राशी बदलणार आहेत. चंद्र हा सर्वात वेगाने राशी बदलण्यासाठी ओळखला जातो. 19 मार्च रोजी चंद्र हा मंगळ राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, जाणून घेऊया कोणत्या 3 राशींसाठी भाग्याचे तारे चमकणार आहेत?
चंद्र संक्रमणामुळे कोणत्या 3 राशींचे भाग्य उजळणार?
कोणत्याही राशीमध्ये अडीच दिवस राहिल्यानंतर, चंद्र राशी बदलतो. वैदिक पंचांगनुसार चंद्र मंगळाच्या राशीत भ्रमण करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार बुधवार, 19 मार्च रोजी दुपारी 02:06 वाजता चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करेल. अशा स्थितीत 12 राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतो. जाणून घेऊया मंगळाच्या राशीत चंद्र संक्रमणामुळे कोणत्या 3 राशींचे भाग्य उजळू शकते?
मेष
ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशीच्या लोकांसाठी चंद्राचे संक्रमण फायदेशीर ठरू शकते. मित्रांसोबत चांगला वेळ जाईल. कुटुंबातील सदस्यांसह प्रवास करण्याचा विचार करू शकता. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. कठोर परिश्रमाचे लवकरच शुभ फळ मिळू शकते. कामानिमित्त देशाबाहेर जाऊ शकतो. तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करू शकता. आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकतो.
कर्क
ज्योतिषशास्त्रानुसार, कर्क राशीच्या लोकांसाठी चंद्राचे संक्रमण शुभ राहील. नोकरी करणाऱ्यांसाठी काळ चांगला राहील. पदोन्नतीची चर्चा होऊ शकते. उत्पन्न वाढीसह पदोन्नती होऊ शकते. व्यावसायिकांसाठी काळ चांगला राहील. व्यवसायात प्रगती होईल. जुने मित्र भेटू शकतात. भागीदारीत केलेले काम तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
वृश्चिक
ज्योतिषशास्त्रानुसार, वृश्चिक राशीचा शासक ग्रह मंगळ आहे आणि या राशीच्या लोकांना या राशीत चंद्र संक्रमणाचा फायदा होऊ शकतो. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. संबंध पूर्वीपेक्षा अधिक दृढ होऊ शकतात. पदोन्नतीची चर्चा होऊ शकते. ज्या कामाचा तुम्ही खूप दिवसांपासून विचार करत आहात त्यात तुम्हाला यश मिळू शकते. वैवाहिक जीवन आनंदी राहील. जीवनात आनंद मिळेल. कुटुंबातील सदस्यांसह कुठेतरी जाण्याचा बेत आखू शकता.
हेही वाचा>>
Shani Dev: शनिदेवांचा होणार न्याय! अवघे 10 दिवस शिल्लक, 'या' 4 राशींनी सावधान! छोटीशी चूक सुद्धा पडेल महागात
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)