Shiva Mantra : सोमवारी भोलनाथ म्हणजेच भगवान शंकराची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते. असे म्हणतात की, भोलेनाथ अतिशय भोळे असून भक्तांवर सहज प्रसन्न होतात. सोमवारी भगवान शिवाची पूजा करणे आणि त्यांच्याशी संबंधित काही विशेष उपाय करणे खूप प्रभावी मानले जाते. पुराणानुसार शिवलिंगावर श्रद्धेने जल आणि बेलपत्र  अर्पण केला जातो. काही मंत्रांचा जप केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. चला जाणून घेऊया शिवाच्या या खास मंत्रांबद्दल.

शिवाचा पंचाक्षरी मंत्र

ओम नमः शिवाय

या मंत्राला पंचाक्षरी मंत्र किंवा भगवान शिवाचा मूल मंत्र म्हणतात. जो कोणी भक्त या मंत्राचा भक्तीभावाने जप करतो त्याला सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. शिवाच्या पंचाक्षरी मंत्राचा जप केल्याने माणसाला मोक्षही प्राप्त होतो. त्यामुळे व्यक्तीमध्ये धैर्याचा संचार होतो.

शिव गायत्री मंत्र

ॐ तत्पुरुषाय विद्महे, महादेवाय धीमही, तन्नो रुद्र प्रचोदय

शिव गायत्री मंत्राचा जप केल्याने भक्तांना सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते. या मंत्राचा जप केल्याने पापांचा नाश होतो, मानसिक शांती मिळते आणि व्यक्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा येते. पूजेत या मंत्राचा जप केल्याने शिव लवकर प्रसन्न होतात, असे म्हटले जाते.

महामृत्युंजय मंत्र

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्

उर्वारुकमिव बन्धनान मृत्योर्मुक्षीय मामृतात् 

भगवान शिवाच्या महामृत्युंजय मंत्राने अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते. जर एखाद्याच्या कुंडलीत अकाली मृत्यूचा योग असेल तर त्याने महामृत्युंजयचा जप करावा. या मंत्राचा नियमित जप केल्याने सर्व प्रकारचे रोग, दोष आणि समस्या दूर होतात, अशी श्रद्धा आहे.

लघु महामृत्युंजय मंत्र

ॐ हौम जम सह

ज्यांना महामृत्युंजय मंत्राचा जप करता येत नाही त्यांनी लघु महामृत्युंजय मंत्राचा जप करणे चांगले. रात्री या मंत्राचा जप केल्यास सर्व असाध्य रोग दूर होतात. लघु महामृत्युंजय मंत्राने भक्तांच्या सर्व अडचणी दूर होतात, असे म्हटले जाते. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

संबंधित बातम्या

Geeta Gyan : या दोन गोष्टी माणसाला दुबळे बनवतात, जाणून घ्या गीतेमधील अनमोल विचार