Mohini Ekadashi 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पंधरवड्यातील एकादशीचे (Ekadashi) विशेष महत्त्व आहे. प्रत्येक एकादशीचे स्वतःचे महत्त्व असते. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला मोहिनी एकादशी (Mohini Ekadashi) म्हणून ओळखतात. यावेळी 19 मे रोजी मोहिनी एकादशी साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी व्रत ठेवून काही ज्योतिषीय उपाय केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात. त्याचबरोबर या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने देखील शुभ फळ मिळते अशी मान्यता आहे. 


धार्मिक शास्त्रानुसार मोहिनी एकादशीच्या दिवशी उपवास केल्यास भक्तांना पापांपासून मुक्ती मिळते. तथापि, अशी काही कार्ये आहेत जी टाळली पाहिजेत. या गोष्टी केल्याने भगवान विष्णू नाराज होतात.


मोहिनी एकादशीला काय करू नये



  • ज्योतिष शास्त्रानुसार, जर तुम्ही एकादशीचा उपवास करत नसाल तर या दिवशी भात खाऊ नका. असे केल्यास पुढील जन्मात सरपटणारे प्राणी म्हणून जन्माला याल अशी मान्यता आहे. 

  • एकादशीच्या दिवशी चुकूनही कोणासाठी अपशब्द वापरू नका. तसेच कोणावरही कोणत्याही प्रकारे रागावू नका. मन शांत ठेवण्यासाठी या दिवशी योगा आणि ध्यान करा. 

  • ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी कांदा, लसूण, मांस आणि मद्य अशा पदार्थांचं सेवन टाळावं. जर तुम्ही या गोष्टींचे सेवन केले तर भगवान विष्णूच्या प्रकोपामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागू शकतो. 

  • मोहिनी एकादशीच्या दिवशी तुम्हाला भगवान विष्णूचा आशीर्वाद घ्यायचा असेल, तर चुकूनही मोठ्यांचा अपमान करू नका.

  • शास्त्रानुसार या दिवशी शारीरिक संबंध टाळावेत. वासनेतून जन्मलेले विचार मनात येऊ नयेत. या काळात धार्मिक पुस्तके वाचा. मन एकाग्र करण्यासाठी असे काम करा ज्यात तुमची आवड असेल. 


मोहिनी एकादशीच्या दिवशी या गोष्टी लक्षात ठेवून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्यास तुमच्या जीवनात कधीही धनाची कमतरता भासणार नाही. तसेच पैशांचा पाऊस पडेल. एकादशीच्या दिवशी व्रत केल्यास माणसाची पापेही नष्ट होतात. आणि शेवटी मोक्ष प्राप्त होतो. 


मोहिनी एकादशीला 'या' मंत्रांचा जप करा 


भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी आजच्या दिवशी मंत्रांचा जप करा. असे मानले जाते की मंत्र जप केल्याने मानसिक शांती मिळते. 


 ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
 नारायणाय विद्महे । वासुदेवाया धीमही ।


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Mohini Ekadashi 2024 : मोहिनी एकादशीला जुळून आले दुर्मिळ योग; 'या' राशींची होणार लखलखाट, नोकरी-व्यवसायासह सर्वत्र मिळणार लाभ