Mercury Retrograde In Mesh : ग्रहांचा राजकुमार बुध (Mercury) हा बुद्धिमत्ता आणि वाणीचा कारक मानला जातो. बुध ग्रहाने चाल बदलली तर याचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर होतो. सध्या बुध मेष राशीत आहे आणि 2 एप्रिलला बुध मेष राशीत वक्री चाल चालेल. बुधाच्या या चालीचा काही राशींना विशेष लाभ मिळू शकतो, तर काही राशीच्या लोकांना या काळात सावध राहावं लागणार आहे. बुध ग्रहाच्या उलट्या चालीमुळे कोणत्या राशीच्या लोकांना फटका बसणार? जाणून घ्या


मेष रास (Aries)


मेष राशीच्या चढत्या घरात बुध वक्री होत आहे, म्हणजेच उलटी चाल चालत आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांना थोडं सावध राहावं लागणार आहे. पैशाशी संबंधित बाबींमध्ये थोडं सावध राहण्याची गरज आहे, कारण अनावश्यक खर्चामुळे त्रास होऊ शकतो. यासोबतच तुमच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येऊ शकतात. आर्थिक योजनांबाबत थोडं सावध राहा. कुटुंबासोबत काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतो, त्यामुळे अनावश्यक रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा नातेसंबंध बिघडू शकतात. भूतकाळातील काही गोष्टी पुन्हा समोर येतील आणि भांडणं होतील, त्यामुळे तुमच्या भावनांवर थोडं नियंत्रण ठेवा.


वृषभ रास (Taurus)


वृषभ राशीच्या लोकांना बुध ग्रहाच्या उलट्या चालीचा फटका बसेल. नोकरी-व्यवसायात तितके चांगले परिणाम मिळणार नाही. तुम्हाला या काळात आर्थिक झळ जाणवेल. या राशीच्या लोकांचा कुणी व्यक्ती विश्वासघात करू शकतो, त्यामुळे सर्वांवर विश्वास ठेवणं टाळा. लोक तुमचा वापर करतील आणि निघून जातील. यासोबतच या काळात तुमच्या वैवाहिक जीवनातही अडचणी निर्माण होऊ शकतात.


कन्या रास (Virgo)


कन्या राशीच्या आठव्या घरात बुध उलटी चाल चालेल. हे घर करिअर आणि आर्थिक दृष्टिकोनातून फारसं चांगलं नाही, असं म्हटलं जातं. त्यामुळे या काळात या राशीच्या लोकांना आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. कौटुंबिक जबाबदाऱ्यांचं ओझं तुमच्यावर पडू शकतं, तुमचे जास्त पैसे खर्च होण्याची शक्यता असते. या काळात तुम्हाला मानसिक आणि शारीरिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही कुणाशीही स्पष्टपणे संवाद साधू शकणार नाही आणि यामुळे गैरसमज वाढतील. व्यवसायात कोणतंही पाऊल उचलताना सावधगिरी बाळगा, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. तुमच्या आरोग्याबाबतही थोडं जागरूक राहण्याचा प्रयत्न करा.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हे ही वाचा :


Rajyog : तब्बल 50 वर्षांनंतर राहू-शुक्राच्या युतीमुळे बनला विपरीत राजयोग; 'या' 3 राशींचं नशीब पालटणार, मिळणार बक्कळ पैसा