Vipreet Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर आपली चाल बदलतात. ग्रहांच्या चालीतील या बदलामुळे अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होत असतात, ज्याचा परिणाम संपूर्ण मानवी जीवनावर होतो. धनाचा दाता असलेल्या शुक्र ग्रहाने 31 मार्चला मीन राशीत प्रवेश केला आहे, जिथे राहू ग्रह आधीपासून उपस्थित आहे. या दोन ग्रहांच्या युतीमुळे विपरीत राजयोग (Rajyog) निर्माण झाला आहे. या राजयोगाचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. पण मुख्यत्वे 3 राशींच्या लोकांना या राजयोगाचा फायदा होईल, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घ्या


कर्क रास (Cancer)


राहू आणि शुक्राची युती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते, कारण या दोन ग्रहांचा संयोग तुमच्या राशीच्या नवव्या घरात होत आहे . म्हणून हा काळ तुमच्यासाठी भाग्याचा ठरू शकतो. या काळात नोकरी तुमचं पद वाढेल आणि पगारवाढ झाल्याने उत्पन्नात झपाट्याने वाढ होईल. समाजात तुमचा मान-सन्मानही वाढेल. यावेळी, तुम्ही देश-विदेशात प्रवास करू शकता. तसेच या काळात तुमची प्रलंबित कामं पूर्ण होतील. तसेच विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ राहील, तुम्ही कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळवू शकता.


मिथुन रास (Gemini)


मिथुन राशीच्या लोकांसाठी राहू आणि शुक्राची युती अनुकूल ठरेल, कारण हा संयोग तुमच्या कुंडलीच्या कर्म घरात तयार झाला आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात चांगलं यश मिळू शकतं. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी अनेक नवीन संधी मिळतील, ज्यांचा फायदा घेत तुम्ही तुमच्या करिअरमध्ये प्रगती कराल. व्यापारी वर्गाला या काळात मोठी ऑर्डर मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना यावेळी कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, तसेच नोकरदारांना प्रमोशन मिळू शकतं.


वृषभ रास (Taurus)


शुक्र आणि राहूची युती वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ ठरेल, कारण हा संयोग तुमच्या राशीच्या उत्पन्न आणि लाभाच्या घरात होत आहे. त्यामुळे यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. या काळात तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत तयार होतील. त्याचबरोबर व्यवसायाशी संबंधित लोकांना फायदा होऊ शकतो. वैवाहिक जीवनात तुमचा तुमच्या जोडीदाराशीही चांगला समन्वय राहील. सुखी वैवाहिक जीवनामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. या काळात तुम्हाला गुंतवणुकीतून फायदा होईल. तसेच या काळात तुम्हाला शेअर बाजार आणि लॉटरीतून लाभ मिळू शकतात.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shani Dev : तब्बल 30 वर्षांनंतर शनीचं नक्षत्र परिवर्तन; कुंभसह 'या' 3 राशींच्या धनात होणार अपार वाढ, सर्व समस्या मिटणार