Amavashya 2024:   हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे. यापैकी काही अमावस्या विशेष मानल्या गेल्या आहेत. पौष  महिन्याची अमावस्या ( Amavasya 2024) खूप खास आहे. कारण वर्षातील सर्व 12 अमावस्यांपैकी ही एकमेव मौनी अमावस्या म्हणजे षौष अमावस्या आहे. ज्यामध्ये स्नान, दान याशिवाय मौनव्रत पाळण्याचे विशेष महत्त्व आहे.  अमावस्या आली की बरेच जण घाबरतात. अमावस्या म्हणजे अशुभ दिवस असे मानले जाते. पण अमावस्येच्या दिवशी आपण असे काही उपाय करू शकतो की आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येणार नाही. 


कधी आहे अमावस्या? 


मौनी अमावस्या किंवा पौष अमावस्या येत्या शुक्रवारी म्हणजे 9 फेब्रुवारीला आहे. अमावस्या सकाळी 8 वाजून दोन मिनिटानी सुरू होईल आणि 10 तारखेला पहाटे 4 वाजून 28 मिनिटानी समाप्त होईल.  


अमावस्येला करायचे दहा उपाय 


1. घरातील प्रत्येक गृहिणीचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे घरातील स्वयंपाकगृह ज्याला आपण किचन म्हणतो. या किचनमध्ये शाकाहारी आणि मांसाहरी असे दोन्ही प्रकारचे पदार्थ आपण शिजवतो. जेव्हा अमावस्या येईल तेव्हा गॅस आणि किचन ओटा स्वच्छ घासून कपड्याने कोरडा करावा. स्वच्छता झाल्यानंतर किचनमधील भिंतीवर हळदीने स्वस्तिक काढावे. हळद घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते. स्वस्तिक हे हिंदू धर्मात शुभ चिन्ह मानले जाते. 


2. किचन स्वच्छ केल्यानंतर गॅसची पूजा करावी. गॅसची पूजा करताना मातीची पणती वापरावी. पूजा केल्यानंतर पणती स्वयंपाकगृहातच ठेवू नये ती बाहेर लावावी.


3. अमावस्येला लावण्यात येणारा दिवा कायम तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा लावावा.  पुजा करताना  अन्नपूर्णा देवीला स्मरण करावे. सकाळी किंवा संध्याकाळी ही पूजा करावी.


4. अमावस्येचा दिवस घरातील जाळ्या, साफसफाई करण्यासाठी चांगला मानला जातो. 


5. साफसफाईबरोबर तु्म्ही घरातील बंद पडलेली उपकरणे बाहेर टाकून द्या किंवा दुरुस्त कर. तसेच अडगळीतील निरुपयोगी सामान बाहेर काढा. तुमची अडकलेली काम पूर्ण होतील.


6. घरातील फरशी पुसताना पाण्यात थोडी हळद, सैंधव मीठ पाण्यात टाकावे. यामुळे नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते. उंबरा देखील स्वच्छ पाण्याने धुवा


7. देवपुजा करताना  दह्यामध्ये चिमूटभर हळद आणि दोन कापराच्या वड्यांची पावडर टाकून देवाचे टाक आणि मूर्ती स्वच्छ करावी. हा अमावस्येच्या दिवशी नक्की करावा


8.  अमावस्येला आपल्या मुख्यप्रवेशद्वाराच्या उंबरठ्याची पुजा करावी. उंबरठ्याला हळदीचे लेपण करावे किंवा उंबरठ्यावर हळदीच्या पेस्टने स्वस्तिक काढावे.उंबरठा फुलांनी, रांगोळीने सुशोभित करावा.


9. अमावस्येला घरात दीपप्रज्वलन  करावे. 


10. घरात धूप जाळावे 


पौष अमावस्या नाही तर प्रत्येक अमावस्येला हे उपाय  केले पाहिजे. जेणेकरून आपले मन प्रसन्न राहिल आणि नकारत्मक ऊर्जा बाहेर जाईल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हे ही वाचा :


Vastu Tips: पुजा करताना स्टीलची भांडी वापरणं शुभ की अशुभ? जाणून घ्या, काय सांगतं वास्तूशास्त्र