Vastu Tips :   स्वत:चे हक्काचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. आपल्या  घरात सुख समृद्धी राहावी . यासाठी नवीन घरात प्रवेश करताना आपण गृहप्रवेश (Vastu Tips)  करतात.  घरात प्रवेश करण्यापूर्वी हवन, ग्रहशांती, शुद्धीकरण आदी पूजा करून घेतली जाते. गृहप्रवेशाच्या पूजेने घरात सुख-समृद्धी येते. घर शुद्ध होते, घरातील नकारात्मकता दूर होते.  गृहप्रवेशाच्या पूजेने घरात सुख-समृद्धी येते. पुजा करताना काही छोट्या चुका होतात. या चुका छोट्या वाटत असल्या तरी भविष्यात या छोट्या चुका मोठ्या  समस्या आणू शकतात. पुजेच्या वेळी पुजा करण्यासाठी नक्की कोणती भांडी वापरावी? या संदर्भात आपण नेहमीच संभ्रमावस्थेत असतो. कोणी म्हणते स्टीलची भांडी वापरणे शुभ तर कोणी म्हणते अशुभ.. आज या विषयी असणाऱ्या सर्व शंका  आज आपण या लेखातून जाणून घेऊया.


पुजा करताना कोणत्या धातूचा वापर करावा?


वास्तूशास्त्रानुसार कोणतीही पूजा करताना स्टील, लोखंड आणि अॅल्युमिनिअमची भांडी वापरणे शुभ नाही, शास्त्रानुसार कोणतेही  धार्मिक कार्य करताना कायम सोने, चांदी आणि तांबे वापरणे शुभ असेल.


स्टीलची भांडी का वापरू नये?


ज्योतष शास्त्रनुसार वस्तूशांती करताना पुजा करताना विधीवत पुजा करणे गरजेचे आहे.  स्टील, अॅल्युमिनिअम आणि लोखंड हे धातू शुद्ध धातूच्या श्रेणीत येत नाही.त्यामुळे ही भांडी पुजेसाठी वापरली जात नाही. तसेच पुजा पाठ करण्यासाठी नैसर्क धातूचा वापर केला पाहिजे, असे मानले जाते. स्टील हे मानवनिर्मित आहे. लोखंडाला  गंज लागतो त्यामुळे हा धातू वापरत नाही. त्यामुळे लोखंडापासून कधीही मूर्ती बनवत नाहीत.  


छोटीशी चूक बनते मोठ्या समस्येचे कारण


प्रत्येक व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हायचे असते. वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्ही कमावल्यानंतरही पैशांची बचत होत नसेल, तर याचे कारण जाणूनबुजून किंवा नकळत पैशाशी संबंधित चुका असतात, ज्यामुळे लक्ष्मी देवी कोपते. कधी कधी छोटीशी चूकही मोठ्या समस्येचे कारण बनते. त्याचप्रमाणे वास्तु नियमांचे पालन न केल्यास व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. परिस्थिती अशी बनते की भरपूर कमावले तरी खर्च उत्पन्नाच्या एक रुपयापेक्षा कमी राहतो.  


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हे ही वाचा : 


Shani Dev: शनिची पिडा घालवण्यासाठी शनिवारी करा 'हे' उपाय; प्रत्येक समस्या होईल दूर