Shani Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा न्यायाधीश शनी (Shani Dev) फेब्रुवारी महिन्यात आपली स्थिती बदलणार आहे. शनी (Lord Shani) सध्या पूर्व भाद्रपदाच्या पहिल्या स्थानात विराजमान आहे. 2 फेब्रुवारी रोजी शनी पूर्व भाद्रपदाच्या प्रथम चरणातून निघून द्वितीय चरणात संक्रमण करणार आहे. शनीचं हे संक्रमण 2 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 08 वाजून 51 मिनिटांनी होणार आहे. शनीच्या या हालचालींमुळे सर्वच राशींवर याचा परिणाम होणार आहे. मात्र, 3 राशींना चांगलाच लाभ मिळणार आहे. या राशी (Zodiac Sign) कोणत्या ते जाणून घेऊयात. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


मिथुन राशीच्या लोकांनी शनीच्या संक्रमणाच्या काळात कोणतीच चिंता करण्याची गरज नाही. या काळात तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल जीवनात चांगले सकारात्मक बदल झालेले दिसून येतील. तसेच, या काळात तुम्ही धार्मिक यात्रेला जाण्याचा शुभ योग जुळून येणार आहे. धनसंपत्तीत चांगली वाढ होईल. देवी लक्ष्मीची तुमच्यावर सदैव कृपा असणार आहे. तसेच, आरोग्याच्या बाबतीतही तुम्हाला कोणती चिंता करण्याची गरज नाही. 


कर्क रास (Cancer Horoscope)


कर्क राशीच्या लोकांसाठी शनीची ही स्थिती फार लाभदायी ठरणार आहे. या काळात तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगले अनुभव मिळतील. अनेक नवीन गोष्टी तुम्ही शिकून घ्याल. तसेच, उच्च अधिकाऱ्यांचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. नोकरीत तुमची स्थिती चांगली राहील. तसेच, जे लोक सिंगल आहेत त्यांना लवकरच जोडीदार भेटण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ देखील होऊ शकतो. 


मकर रास (Capricorn Horoscope)


मकर राशीच्या लोकांना या काळात नशिबाची चांगली साथ मिळेल. तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार अधिक मोठा होईल. या काळात तुम्हाला एखादी शुभवार्ता देखील मिळू शकते. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळेल. विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ फार महत्त्वाचा असमार आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :                                             


Astrology : आज मौनी अमावस्येचा दिवस 3 राशींसाठी खास; शशि आदित्य योगासह बनले अनेक शुभ योग, उजळेल निद्रीस्त भाग्य