Mars Transit 2025: यंदाचा 2025 हा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्ताचा आहे. या वर्षात मोठ्या ग्रहांचे संक्रमण, परिवर्तन होत असल्याने बऱ्याच लोकांच्या जीवनात अनेक बदल आढळून येतील. काहींसाठी फायदेशीर तर काही राशींच्या लोकांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 2025 हे मंगळाचे वर्ष आहे. ज्योतिषशास्त्रात मंगळाला ग्रहांचा सेनापती म्हणतात. मंगळाचे नाव काढताच भल्याभल्यांना घाम फुटतो. कारण असं म्हणतात, ज्याच्या राशीत मंगळ असतो, त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. होळीनंतर मंगळाच्या हालचालीत बदल होताच काही राशींच्या अडचणी वाढतील. त्यांच्या जीवनात तणाव वाढेल आणि त्यांची आर्थिक परिस्थितीही बिघडू शकते. होळीनंतर मंगळ ग्रह कोणत्या राशींसाठी अशुभ असेल? असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर ज्योतिषशास्त्रानुसार सविस्तर जाणून घ्या,,,


मंगळाचा दुसऱ्या राशीत प्रवेश अशुभ?


ज्योतिषशास्त्रानुसार, 3 एप्रिल 2025 रोजी दुपारी 1:56 वाजता मंगळ कर्क राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून ते शुभ मानले जाणार नाही. एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार ज्योतिषी पंडित डॉ. अरविंद त्रिपाठी यांच्याकडून जाणून घ्या मंगळाच्या संक्रमाणाने कोणत्या राशींचे नुकसान होऊ शकते?


मेष- समस्यांमुळे तणाव वाढू शकतो?


ज्योतिषी म्हणतात, मेष राशीमध्ये मंगळ पहिल्या आणि आठव्या घराचा स्वामी असेल आणि चौथ्या घरात प्रवेश करेल. या ग्रहाचे संक्रमण होताच मेष राशीच्या लोकांच्या जीवनात अशांतता येईल. घरातील काही समस्यांमुळे तणाव वाढू शकतो. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये नवीन आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. जर तुम्ही व्यापारी असाल तर शक्य तितके गप्प राहा, तुमचा सौदा खराब होऊ शकतो. या काळात तुमचा खर्च वाढेल तुमच्या आईच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या.


मिथुन - अनावश्यक वादात अडकाल?


मंगळ कर्क राशीत प्रवेश करताच मिथुन राशीच्या लोकांच्या अडचणी वाढू शकतात. तुम्ही अनावश्यक वादात अडकू शकता. काही कायदेशीर बाबींमध्ये तुमचे नाव येऊ शकते. तुमच्या आर्थिक परिस्थितीकडे लक्ष द्या, आर्थिक नुकसानही होऊ शकते. विशेषत: या काळात आपल्या मित्रांशी सावधगिरी बाळगा. फक्त तुमच्या जवळचेच तुमचे नुकसान करू शकतात.


मीन - जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता


ज्योतिषी यांच्यानुसार मंगळ हा दुसऱ्या आणि नवव्या घराचा स्वामी असल्यामुळे या राशीच्या पाचव्या घरात राहणार आहे. मंगळ आपल्या निम्न राशीत प्रवेश करताच मीन राशीच्या लोकांच्या नशिबात विलंब होईल. जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाचा ताण वाढू शकतो. तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा आणि या काळात शांत राहून फायदा होऊ शकतो.


हेही वाचा>>>


 


Astrology: 1 फेब्रुवारी आणि माघी गणेशोत्सवाचा अद्भूत संयोग! 'या' 5 राशींचं नशीब चमकणार, मोठं यश मिळणार, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )