Ruchak Yog in Diwali: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह आणि नक्षत्रांच्या चालीचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येतो. ग्रहांच्या स्वतःच्या राशीतील मार्गक्रमणामुळे आणि उच्च राशीतील चालीमुळे राजयोग आणि शुभ योग तयार होतात. यावेळी दिवाळीनंतर (Diwali 2023) अनेक ग्रहांचं गोचर होऊन शुभ-अशुभ योग निर्माण होणार आहेत. सर्व ग्रहांचा सेनापती मंगळ नोव्हेंबरमध्ये वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे आणि अशा स्थितीत रुचक राजयोग तयार होईल. राजयोगाचा परिणाम सर्व राशींवर दिसून येईल, पण 3 राशीच्या लोकांना यामुळे आर्थिक लाभ होईल.


सिंह रास (Leo)


या राशीच्या लोकांना रुचक राजयोगाचे अनुकूल परिणाम मिळतील. रूचक राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यावेळी तुम्ही वाहन आणि मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. तुम्हाला करिअर आणि व्यवसायात काही उत्कृष्ट ऑफर मिळू शकतात. आर्थिक बाबतीत हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. यावेळी नशीब तुम्हाला साथ देईल. प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्हाला कधीही संपत्तीची कमतरता भासणार नाही. स्थावर मालमत्तेशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ उत्कृष्ट सिद्ध होणार आहे.


मकर रास (Capricorn)


या राशीच्या लोकांसाठीही रुचक राजयोगाची निर्मिती अनुकूल ठरणार आहे. मंगळ तुमच्या संक्रमण कुंडलीतील उत्पन्नाच्या घरात जाणार आहे, त्यामुळे यावेळी तुमचं उत्पन्न वाढेल. तुमच्या उपजीविकेचं साधन वाढेल. करिअरमध्ये लक्षणीय प्रगती होईल. नशीब तुम्हाला साथ देईल आणि व्यवसायात प्रगती होईल. नोकरदारांना यावेळी वेतनवाढ आणि पदोन्नती मिळू शकते. वडिलांचं सहकार्य मिळेल. तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये काही सुवर्ण संधी मिळू शकतात. एखाद्याला दिलेलं कर्ज परत मिळवू शकता. बिझनेसमध्ये नवीन संधी मिळतील आणि पैशाशी संबंधित बाबींमध्ये विशेष फायदा होणार आहे.


तूळ रास (Libra)


रूचक महापुरुष राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण मंगळ तुमच्या राशीतून धन गृहात जाणार आहे. या राजयोगामुळे तुम्हाला विविध पैलूंमध्ये सकारात्मक बदल दिसतील. यावेळी तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित पैसे मिळतील. तुम्हाला आर्थिक बाबतीत फायदा होईल. तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा दिसून येणार आहे. या काळात तुमच्या वैवाहिक जीवन आनंदी राहणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडूनही सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी येण्याची शुभ शक्यता आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Diwali 2023: दिवाळीत झाडू का खरेदी केला जातो? जाणून घ्या धनत्रयोदशीला झाडूच्या पूजेचं विशेष महत्त्व