March Month Shubh Vivah Muhurta 2025 : हिंदू धर्मानुसार, प्रत्येक तिथी आणि वेळेचं खास महत्त्व असतं. विशेषत: जेव्हा सूर्याच्या राशी परिवर्तनाला आपण संक्रांती म्हणतो. ही तिथी फार महत्त्वाची मानली जाते. ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य एका राशीत 30 दिवसांपर्यंत विराजमान असतो. त्यानंतर राशी परिवर्तन करतात. जेव्हा सूर्य देव मीन आणि धनु राशीत स्थित असतात तेव्हा खरमासाचा काळ सुरु होतो. खरमासाच्या दरम्यान शुभ कार्य केलं जात नाही. जर पुढच्या महिन्यात तुमचा देखील शुभ विवाहाचा प्लॅन असणार आहे. तर त्यासाठी शुभ मुहूर्त नेमके कोणते या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

मार्च महिन्यात केव्हा सुरु होणार खरमास?

ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य देव 14 मार्च 2025 रोजी कुंभ राशीतून निघून मीन राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याने मीन राशीत संक्रमण करताच खरमासाचा काळ सुरु होईल. त्यानंतर 14 एप्रिल रोजी मीन राशीतून निघून मेष राशीत संक्रमण करणार आहे. याचाच अर्थ, 14 मार्चपासून ते 14 एप्रिल पर्यंत कोणतंही शुभ कार्य जसे की, लग्न समारंभ, गृहप्रवेश, मुंज यांसारखी शुभ कार्य करु नयेत. त्यामुळे मार्च महिन्यात कोणते शुभ मुहूर्त आहेत ते जाणून घेऊयात. 

शनिवार, 1 मार्च 2025

शुभ विवाह मुहूर्त : सकाळी 11:22 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 06:45 पर्यंत

नक्षत्र : उत्तर भाद्रपद

तिथी : फाल्गुन शुक्ल द्वितीया, तृतीया

त्रिपुष्कर योग : सकाळी 06:46 ते 11:22 पर्यंत

साध्य योग : दुपारी 04:25 पर्यंत, त्यानंतर शुभ योग

रविवार, 2 मार्च 2025

शुभ विवाह मुहूर्त : सकाळी 06:45 ते रात्री 01:14 पर्यंत

नक्षत्र : उत्तर भाद्रपद, रेवती

तिथी : फाल्गुन शुक्ल तृतीया, चतुर्थी

शुभ योग : दुपारी 12:39 पर्यंत, त्यानंतर साध्य योग

सर्वार्थ सिद्धी योग : सकाळी 06:45 ते सकाळी 08:59, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 06:39 ते 06:44 पर्यंत

रवि योग : दुसऱ्या दिवशी सकाळी 8.59 ते सकाळी 6.39

गुरुवार, 6 मार्च 2025

शुभ विवाह मुहूर्त : रात्री 10.1 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6.40

नक्षत्र : रोहिणी, मृगाशिरा

तिथी : फाल्गुन शुक्ल अष्टमी

प्रीति योग : रात्री 08:29 पासून

शुक्रवार, 7 मार्च 2025

शुभ विवाह मुहूर्त : सकाळी 06:40 ते रात्री 11:32

नक्षत्र : मृगाशिरा

तिथी : फाल्गुन शुक्ल अष्टमी, नवमी

प्रीति योग : संध्याकाळी 06:15 पर्यंत, त्यानंतर आयुष्मान योग

रवि योग : दुपारी 11:32 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 06:39 पर्यंत

बुधवार, 12 मार्च 2025

शुभ विवाह मुहूर्त : सकाळी 08:43 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 04:05

नक्षत्र : मघा

तिथी : फाल्गुन शुक्ल चतुर्दशी

सुकर्म योग : दुपारी 01:00 पर्यंत, त्यानंतर धृती योग

रवि योग : दुसऱ्या दिवशी सकाळी 06:34 ते 04:05 पर्यंत

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:        

March 2025 Monthly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींसाठी मार्च महिना कसा असणार? वाचा मासिक राशीभविष्य