March 2025 Monthly Horoscope : 2025 या वर्षाचा दुसरा महिना आज संपणार आहे. तर, उद्यापासून मार्च महिन्याला सुरुवात होणार आहे. या महिन्यात अनेक ग्रहांचं संक्रमण असून तूळ ते मीन राशींसाठी हा महिना कसा असणार आहे? कोणत्या राशींना याचे शुभ परिणाम बघायला मिळतील. ज्योतिषीय गणनेनुसार, मार्चचा महिना तूळ ते मीन राशींसाठी कसा असेल ते (Monthly Horoscope) कसा असेल? जाणून घेऊयात.
तूळ रास (Libra Monthly Horoscope March 2025)
तूळ राशीच्या लोकांसाठी मार्चचा महिना चांगला असणार आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. तसेच, तुमची भीती कायमची दूर होईल. मुळात तुम्ही तुमच्या कामाशी प्रामाणिक असाल त्यामुळे तुम्हाला कशाची चिंता नसेल. या काळात मित्र-परिवाराबरोबर तुम्ही धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता.तुमच्या आरोग्यात सुधारणा जाणवेल. तसेच, धनसंपत्तीचा चांगला लाभ तुम्हाला घेता येईल.
वृश्चिक रास (Scorpio Monthly Horoscope March 2025)
आत्मविश्वासाने परिपूर्ण असा वृश्चिक राशीचा पुढचा महिना असणार आहे. या काळात तुमच्यात आत्मविश्वास असेल मात्र, तरीही तुम्हाला कसलीतरी कमतरता, चिंता सतत जाणवत राहील. कुटुंबियांची तुम्हाला चांगली साथ लाभेल. तसेच, महिन्याच्या शेवटी तुमच्या खर्चात देखील वाढ झालेली दिसेल. त्यामुळे खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा. अनावश्यक गोष्टींवर पैसा खर्च करणं टाळा. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या.
धनु रास (Sagitta Monthly Horoscope March 2025)
धनु राशीच्या लोकांसाठी मार्चचा महिना सामान्य असणार आहे. या महिन्यात तुमच्या वाट्याला आनंदाचे क्षण देखील येतील आणि दु:खाचे क्षण देखील येतील. मात्र, या परिस्थितीचा सामना तुम्हाला करता यायला हवा. तसेच, नोकरीत अनेक महत्त्वाचे बदल घडतील. हे बदल स्विकारण्यास तयार राहा. सहकाऱ्यांबरोबर तुमचे मतभेद होतील. तसेच, मानसिक तणावही जाणवेल. या महिन्यात निरोगी आहाराचं पालन करा.
मकर रास (Capricorn Monthly Horoscope March 2025)
मकर राशीच्या लोकांसाठी नवीन महिना चांगला असणार आहे. या काळात तुम्ही धार्मिक कार्यात मग्न असाल. तसेच, भजन, कीर्तन कराल. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती लाभेल. तसेच, या काळात कोणत्याही वादात सहभागी होऊ नका. अन्यथा प्रकरण तुमच्या अंगाशी बेतेल. तसेच, वाहन चालवताना काळजी घ्या. कोणालाही तुमच्या आयुष्याचे निर्णय घेण्याची परवानगी देऊ नका.
कुंभ रास (Aquarius Monthly Horoscope March 2025)
कुंभ राशीसाठी मार्चचा महिना लाभदायक असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तसेच, भौतिक सुख-सुविधांचा चांगला लाभ घ्याल. तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसून येईल. तसेच, या महिन्यात तुम्ही एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करु शकता. पैसे गुंतवणुकीकडे तुमचा चांगला कल दिसून येईल.
मीन रास (Pisces Monthly Horoscope March 2025)
मीन राशीच्या लोकांसाठी मार्चचा महिना चांगला असणार आहे. या काळात तुमच्या अनेकांशी भेटीगाठी होतील. तसेच, जे तरुण उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाण्यासाठी उत्सुक आहेत त्यांच्यासाठी चांगली संधी निर्माण होईल. तुमच्या व्यवसायात काहीसा चढ-उतार पाहायला मिळेल. मात्र, एक गोष्ट लक्षात ठेवा हाही काळ जाणार आहे त्यामुळे हताश किंवा निराश होऊ नका. तुमच्या आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: