Shravan 2024 : श्रावण महिना हा अनेक व्रत-वैकल्यांनी भरलेला असतो. यात मंगळागौर (Mangala Gauri 2024) व्रत हे श्रावण मासातील प्रत्येक मंगळवारी केलं जातं. महिला मोठ्या उत्साहाने मंगळागौर साजरी करतात.


शंकराला मिळवण्यासाठी देवी पार्वतीने अनेक व्रतं केली होती, त्यातील महत्त्वाचं व्रत म्हणजे मंगळागौरी व्रत. हे व्रत विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात, तर अविवाहित महिला चांगला नवरा मिळावा म्हणून करतात. यंदा मंगळागौरी कधी साजरी केली जाईल, तिथी आणि पूजा विधी जाणून घ्या.


पहिली मंगळागौर तिथी


हिंदू पंचागानुसार, पहिला श्रावणी सोमवार हा 5 ऑगस्टला झाला आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच, 6 ऑगस्टला पहिली मंगळागौर साजरी केली जाईल.


संपूर्ण मंगळागौर तिथी


पहिली मंगळागौर : 6 ऑगस्ट 2024 
दुसरी मंगळागौर : 13 ऑगस्ट 2024 
तिसरी मंगळागौर : 20 ऑगस्ट 2024 
चौथी मंगळागौर : 27 ऑगस्ट 2024 
पाचवी मंगळागौर : 3 सप्टेंबर 2024 


मंगळागौर का साजरी करतात?


मंगळागौरला देवी पार्वतीची पूजा केली जाते. घरात सुख-समृद्धी यावी, चांगलं आरोग्य लाभावं आणि वैवाहिक सुखाच्या आशीर्वादासाठी मंगळागौरीचं व्रत केलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार, नवविवाहित स्त्रियांनी मंगळागौरीचं व्रत केल्याने त्यांना सौभाग्य प्राप्त होतं. विवाहाच्या पहिली पाच वर्षे हे व्रत करावं लागतं.


मंगळागौर पूजा पद्धत



  • नवविवाहितेने सकाळी लवकर उठून लग्नातील अन्नपूर्णेची धातूची मूर्ती चौरंगावर स्थापन करावी.

  • चौरंगावर शिवपिंड ठेवावी, त्यानंतर गणपतीचा फोटो ठेवून गणेश पूजन देखील करावं.

  • नंतर त्यासमोर कणकेच्या दिव्यांची आरास सजवावी.

  • मंगळागौर किंवा अन्नपूर्णेच्या मूर्तीवर शिव-मंगळागौरीचं आवाहन करावं.

  • देवीला विविध झाडांची पानं, फुलं वाहावीत. नंतर तांदूळ, पांढरे तीळ, जिरे, मुगाची डाळ अशा धान्यांची मूठ अर्पण करावी. मंगळागौरीची कहाणी वाचावी. महानैवेद्य अर्पण करावा. 16 दिव्यांनी आरती करावी. यानंतर षोडशोपचार पूजा करताना अखंड सौभाग्य प्राप्ती

  • आणि सर्व मनोकामना पूर्ण करण्या करता देवीला 3 अर्घ्य द्यावीत.

  • मंगळागौरीसाठी महिलांना आमत्रंण द्यावे. त्यांना भोजन खाऊ घालावं, हळदी-कुंकू लावावं आणि वाण द्यावं.

  • संध्याकाळी आरती करावी. रात्रभर जागरण करावं. सुवासिनी महिला फुगड्या, झिम्मा, खेळत, गाणी गात मंगळागौर जागवतात.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Shravan 2024 : तब्बल 71 वर्षांनंतर यंदा श्रावणाची सुरुवात सोमवारपासून; 'या' 4 राशींचं नशीब पालटणार, महादेवाच्या कृपेने होणार अपार धनलाभ