Mangal Surya Yuti 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा सेनापती मंगळ (Mars) ग्रह फार शक्तिशाली मानला जातो. मंगळ ग्रह हा आत्मविश्वास, साहस, ऊर्जा, पराक्रम आणि शक्तीचा कारक ग्रह मानला जातो. मंगळ ग्रह एका राशीत जवळपास 45 दिवसांपर्यंत स्थित असतात. त्यामुळे मंगळ ग्रहाला एका राशीत येण्यासाठी जवळपास 18 महिन्यांचा कालावधी लागतो. या दरम्यान मंगळ ग्रहाचा कोणत्या ना कोणत्या ग्रहाबरोबर संयोग जुळून येतो.
ज्योतिष शास्त्रानुसार, डिसेंबर महिन्यात मंगळ ग्रहाचं ग्रहांचा राजा सूर्याबरोबर संयोग जुळून येणार आहे. 7 डिसेंबर रोजी मंगळ ग्रह धनु राशीत प्रवेश करणार आहे तर 16 डिसेंबरला सूर्यसुद्धा याच राशीत प्रवेश करेल. त्यामुळे या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे आदित्य योग निर्माण होणार आहे. त्यामुळे तीन राशींना चांगलाच फायदा होणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 7 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8 वाजून 27 मिनिटांनी मंगळ ग्रह धनु राशीत प्रवेश करेल. तर, 16 जानेवारीपर्यंत याच राशीत स्थित असणार आहेत. तर, सूर्य ग्रह 16 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 4 वाजून 26 मिनिटांनी धनु राशीत प्रवेश करेल. या ठिकाणी मंगळ आणि सूर्य ग्रहांची युती होणार आहे. त्यामुळे मंगळ आदित्य योग 14 जानेवारी 2026 पर्यंत असणार आहे.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीसाठी मंगळ आणि सूर्य ग्रहाची युती फार शुभकारक ठरणार आहे. या काळात तुमच्या बुद्धिमत्तेचा चांगला विकास होईल. तुमची आर्थिक स्थिती उंचावेल. तसेच, तुमच्या जीवनात अनेक सकारात्मक घटना घडतील. आरोग्य देखील ठणठणीत असण्याची शक्यता आहे. तसेच, अनेक दिवसांपासून तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. नात्यात थोडासा दुरावा निर्माण होऊ शकतो.
तूळ रास (Libra Horoscope)
मंगळ ग्रहाच्या उच्च प्रभावाने तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. धनसंपत्तीत भरभराट होईल. तसेच, या काळात नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल. नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. तसेच, प्रवासाला देखील जाण्याचे अनेक योग जुळून येणार आहेत. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. मात्र, तुमच्या कामावर तुम्ही मनापासून प्रेम आणि त्यासाठी लागणारी मेहनत गेतली पाहिजे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी मंगळ आणि सूर्य ग्रहाची युती फार लाभदायी ठरणार आहे. या राशीच्या लोकांची करिअरमध्ये चांगली प्रगती दिसून येईल. या दरम्यान परदेशात जाण्याची संधीदेखील तुम्हाला मिळू शकते. तसेच, तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. ऑफिसमध्ये तुमच्यावर काही जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. त्या तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडाव्यात.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)