Shani Sade Sati 2026 : ज्योतिष शास्त्रात फक्त शनि (Shani Dev) ग्रहच असा आहे ज्याच्या साडेसाती आणि ढैय्याचा प्रभाव सर्व राशींवर पडतो. इतर ग्रहांची फक्त महादशा आणि अंतर्दशेचा लोकांना सामना करावा लागतो. 2025 मध्ये शनिने संक्रमण करुन मीन राशीत प्रवेश केला. आता 2027 मध्ये शनि संक्रमण करुन मेष राशीत प्रवेश करणार आहे. या दरम्यान तीन राशींवर (Zodiac Signs)शनिची साडेसाती असणार आहे. 

शनी मीन राशीत आहे. या दरम्यान मेष, कुंभ आणि मीन राशीवर शनीच्या साडेसातीचं सावट असणार आहे. 2025 मध्ये सुद्धा या राशींवर शनिची साडेसाती सुरु होती. तसेच, 2026 मध्ये देखील या राशींवर शनिच्या साडेसातीचा प्रभाव असणार आहे. मात्र, हा प्रभाव काहीसा कमी असणार आहे.

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीवर शनिच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरु आहे. त्यामुळे नवीन वर्षात देखील मेष राशीवर साडेसातीचं सावट असणार आहे. या काळात तुम्ही कोणताही निर्णय घेताना नीट विचारपूर्वक घेणं गरजेचं आहे. कारण तुमच्या निर्णयावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. तुमची लव्ह लाईफ देखील काहीशी खास नसणार. पार्टनरबरोबर सतत वाद होतील. घरच्या परिस्थितीत चढ-उतार पाहायला मिळतील. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीवर शनिच्या साडेसातीचा तिसरा टप्पा सुरु आहे. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी कष्टाचा असू शकतो. या राशीसाठी नवीन वर्ष चांगलं असेल मात्र, तरीही तुम्हाला सतर्क राहावं लागेल. जर तुम्ही अनेतिक काम कराल तर शनिकडून तुम्हाला शिक्षा देखील मिळू शकते. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. मेहनतीचा पैसा वाया जाऊ देऊ नका. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीवर शनिच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरु आहे. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी फार कष्टाचा असणार आहे. या काळात तुम्हाला अचानक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. तर, अचानक चांगले दिवस येतील. जवळच्या नातेवाईकांबरोबर चांगले संबंध ठेवा. वाणीत गोडवा असणं गरजेचं आहे. तसेच, व्यवहाराच्या बाबतीत कोणती जोखीम हातात घेऊ नका.  

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Horoscope Today 5 December 2025 : आज शुक्रवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्यशाली; देवी लक्ष्मीच्या कृपेने घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा, आजचे राशीभविष्य