नारायणगाव/पुणे: नारायणगाव-जुन्नर रस्त्यालगत साकार नगरी सोसायटीजवळ रात्री सव्वा आठ वाजता १८ वर्षीय तनिष नवनाथ परदेशी या तरुणावर बिबट्याने हल्ला (Pune Leopard Attack) केला. रात्रीच्या अंधारात मोबाईलवर बोलत उभा असताना बिबट्याच्या नख्या पोटरीवर ओरखडल्याने तो जखमी (Pune Leopard Attack) झाला, नशीब बलवंतर म्हणून तो हल्ल्यातून बचावला आहे. तनिषला नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे असून त्याची प्रकृती स्थिर (Pune Leopard Attack) आहे. वन विभागाच्या टीमने घटनास्थळी पाहणी केली. ड्रोनद्वारे वारुळवाडीतील मीनाक्षी कृपा वसतीगृह परिसरात २०० फूट अंतरावर तीन बिबटे आढळले; कालच इथे चार पाळीव जनावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना ताजी आहे, वनविभागाने परिसरात आठ पिंजरे लावली आहेत. (Pune Leopard Attack)
गेल्या काही दिवसामध्ये जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यांची संख्या वाढली असून शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे, पूर्वीच्या ओतूर, शेटेवाडी व शिवनेरीसारख्या घटनांमुळे वन्यजीव-मानव संघर्ष तीव्र झाला. रात्री मुक्त संचार टाळा व बिबट्या आढळल्यास वनविभागाशी संपर्क साधा असे आवाहन करण्यात येत आहे. (Pune Leopard Attack)
Pune Leopard Attack: नेमकं काय घडलं?
नारायणगाव-जुन्नर रस्त्यालगत साकार नगरी सोसायटीजवळ रात्री ही थरारक घडली. १८ वर्षीय तनिष नवनाथ परदेशी हा तरुण अंधारात फोनवरती बोलत उभारला होता. घटना घडली तेव्हा रात्रीचे सव्वा आठ वाजले होते. हा तरुण फोनवर बोलण्यात गुंग असतानाच बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढवला. बिबट्याचे नखे त्याच्या पोटरीवर ओरबाडले गेले. नखांचे मोठे ओरखडे त्याला यावेळी लागले आहेत. बिबट्याच्या या हल्ल्यात तो जखमी झाला. नशीब चांगलं होतं, म्हणून त्याला जीवदान मिळाले आहे. तनिषला तातडीने नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची तब्येत स्थिर आहे.
Pune Leopard Attack: परिसरात तीन बिबटे
या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली. ड्रोनद्वारे वारुळवाडीतील मीनाक्षी कृपा वसतीगृह परिसरात २०० फूट अंतरावर तीन बिबटे आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काल या परिसरात बिबट्यांनी पाळीव प्राण्यांवर हल्ला केला होता. वनविभागाने या परिसरात आठ पिंजरे लावले आहेत. जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यांची संख्या वाढली असून शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. रात्री मुक्त संचार टाळा असे आवाहन वनविभागाकडून करण्यात येत आहे.
Pune Leopard Attack: किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला बिबट्यांचं दर्शन
छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी गडाच्या पायथ्याला बिबट्याचं दर्शन झालं. एकाचवेळी दोन बिबटे रस्ता ओलांडताना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. गाडीच्या लाईटमध्ये बिबट्या फारसा थांबत नाही, मात्र एक बिबट्या सुस्तावलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यामुळं एखादी शिकार खाऊन हा बिबट्या आला असेल का? अशी शक्यता वर्तवली गेली. खरं तर दहा चौरस किलोमीटर क्षेत्रात एक बिबट्या असेल, असं प्रमाण वनविभागाने गृहीत धरलंय. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांत आंबेगाव, शिरुर अन आता पुन्हा जुन्नर मध्ये टोळीनं बिबट्यांचा मुक्तसंचार दिसून येतोय. त्यामुळं बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलीये, हे पुन्हा-पुन्हा अधोरेखित होतंय. सरकार मात्र एका पाठोपाठ एक नवनवे आश्वासन देतंय, त्याची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही.