Mangal Gochar 2024 : मंगळ ग्रहाला भूमि पुत्र म्हटलं जातं. मंगळ (Mangal Gochar) ग्रहाचं राशी परिवर्तन 12 जुलै रोजी होणार आहे. मंगळ ग्रह शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजून 12 मिनिटांनी वृषभ राशीत संक्रमण करणार आहे. तर, 26 ऑगस्ट दुपारी 3 वाजून 40 मिनिटांनी तो वृषभ राशीतून मार्गक्रमण होऊन मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. अशा प्रकारे मंगळ ग्रह राशीत 46 दिवसांपर्यंत स्थित राहणार आहेत.
मंगळ ग्रहाच्या या राशी परिवर्तनाने 5 राशींच्या लोकांचं भाग्य उजळणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीत मंगळ ग्रहाचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे याचा शुभ प्रभाव या राशीवर दिसणार आहे. मंगळ ग्रहाच्या कृपेने तुम्हाला चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तसेच, या काळात तुमचं प्रमोशन होण्याची देखील शक्यता आहे. या 46 दिवसांत तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात चांगला लाभ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात सुख-शांती असेल.
सिंह रास (Leo Horoscope)
मंगळ ग्रहाच्या संक्रमणाने सिंह राशीच्या लोकांना चांगला लाभ होणार आहे. जे विद्यार्थी आहेत त्यांनी जास्त मेहनत घेणं गरजेचं आहे. मंगळ ग्रहाच्या शुभ प्रभावाने तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. या दरम्यान तुम्हाला नवीन वस्तू खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमचं काम बघूनच तुम्हाला प्रमोशन मिळू शकतं त्यामुळे तुम्ही तुमच्या कामाशी प्रामाणिक असणं गरजेचं आहे. तरच, तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल.
कन्या रास (Virgo Horoscope)
मंगळ ग्रहाच्या राशी परिवर्तनाने कन्या राशीचे लोक मालामाल होऊ शकतात. या राशीच्या लोकांना 12 जुलै रोजी चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही दिवसभर जे काम करता त्यात तुमचं मन रमेल. तसेच, कामाप्रती तुम्हाला सकारात्मक ऊर्जा जाणवेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
मंगळ ग्रहाचं संक्रमण तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणार आहे. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठ सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. जर तुम्हाला नवीन प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. कुटुंबात या कालावधीत तुम्हाला शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे.
मीन रास (Pisces Horoscope)
मंगळ ग्रहाच्या राशीपरिवर्तनाने तुमच्या साहस आणि पराक्रमात चांगली वाढ होईल. तुम्ही ज्या कामांची योजना आखली आहे ते पूर्ण होतील. जर तुम्हाला नोकरी बदलायची असेल तर हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. या दरम्यान तुमच्या कलात्मकतेला चांगला वाव मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :