Makar Sankranti 2023 : मकर संक्रांतीचा (Makar Sankranti 2023) सण साधारणपणे दरवर्षी 14 जानेवारीला येतो. या वर्षी 2023 मध्ये देखील मकर संक्रांतीच्या तारखेबाबत काही वेळेस संभ्रम निर्माण होतो. कधी 14 तर कधी 15 जानेवारीला मकर संक्रांती येते. पण तुम्हाला माहित आहे का मकर संक्राती हा एकमेव सण इंग्रजी कॅलेंडरनुसार 14 किंवा 15 जानेवारीलाच का येतो? हिंदू धर्मग्रंथांमध्ये तसेच खगोलशास्त्रानुसार मकर संक्रांतीबाबत जाणून घ्या



यंदाची मकर संक्रांती 15 जानेवारी 2022 ला
हिंदू पंचांगानुसार यावेळी मकर संक्रांती 15 जानेवारी 2022 रोजी आहे. कारण सूर्यदेव 14 जानेवारीच्या रात्री 08:43 मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करतील, त्यामुळे उदयतिथीनुसार दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 जानेवारी 2023 रोजी मकर संक्रांती साजरी केली जाईल.



मकर संक्रांती 14-15 जानेवारीलाच का?


मकर संक्रांत म्हणजे सूर्याचा धनु राशीपासून मकर राशीत संक्रमणाचा काळ आहे. मकर संक्राती हा एकमेव सण इंग्रजी कॅलेंडरनुसार 14 किंवा 15 जानेवारीलाच का येतो? भारतात प्रचलित सर्व हिंदू कॅलेंडर चंद्रावर आधारित आहेत, म्हणूनच हिंदू सणांच्या इंग्रजी तारखा बदलत राहतात. सध्या वापरात असलेल्या कॅलेंडरला ग्रेगोरियन कॅलेंडर म्हणतात, जे सौर कॅलेंडर आहे, म्हणजेच सूर्यावर आधारित कॅलेंडर आहे. मकर संक्रांती हा एक सण आहे जो पृथ्वीपेक्षा सूर्याच्या स्थितीनुसार साजरा केला जातो. म्हणूनच चंद्राच्या स्थितीत थोड्या प्रमाणात फेरफार झाल्यामुळे हा सण कधी 14 जानेवारीला तर कधी 15 रोजी येतो. सूर्याच्या मुख्य भूमिकेमुळे इंग्रजी तारीख बदलत नाही.


 


संक्रांतीनंतर दिवस मोठे होतात आणि रात्री लहान
माहितीनुसार, मकर संक्रांतीनंतर दिवस मोठे होतात आणि रात्री लहान होतात, उत्तर गोलार्धात 14-15 जानेवारीपर्यंत सूर्यास्ताची वेळ हळूहळू पुढे सरकते. त्यानंतर 21 मार्च ही तारीख येते, जेव्हा दिवस आणि रात्र अगदी समान असतात त्याला इक्विनॉक्स म्हणतात. याचा अर्थ सूर्य जवळजवळ उत्तर गोलार्धाच्या मध्यभागी असतो. सूर्यास्ताच्या वेळेत हळूहळू बदल होणे म्हणजे हिवाळा कमी होतो, त्यानंतर उन्हाळा वाढायला सुरुवात होते. कारण सूर्य उत्तर गोलार्धात जास्त काळ राहणार असतो.



भारतातील विविध राज्यांमध्ये साजरा
मकर संक्रांती हा असा सण आहे, जो भारतातील विविध राज्यांमध्ये अनेक नावांनी आणि अनेक प्रकारे साजरा केला जातो. उत्तर भारतात याला मकर संक्रांत, तामिळनाडूमध्ये पोंगल तर गुजरातमध्ये उत्तरायण म्हणतात. आसाममध्ये याला माघी बिहू आणि कर्नाटकमध्ये सुग्गी हब्बा, केरळमध्ये मकरविक्लू आणि काश्मीरमध्ये शिशु संक्रांत म्हणतात. हा सण केवळ भारतातच नाही तर नेपाळ आणि बांगलादेशसारख्या शेजारील देशांमध्येही साजरा केला जातो. लोक वेगवेगळ्या धार्मिक मान्यतांनुसार हा उत्सव साजरा करतात, परंतु या सणामागे एक खगोलीय घटना आहे.


 


दर 157 वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस आणखी एक दिवसाने पुढे जातो


यंदाची 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे. इ स 1972 सालापासून सन 2085 पर्यंत मकर संक्रांत कधी 14 तर कधी 15 जानेवारीला येईल. 2044 पासून ती नियमितपणे 15 जानेवारी रोजी येईल.सन 2100 पासून मकर संक्रांत 16 जानेवारीला येईल तर 3246 मध्ये मकर संक्रांत चक्क 1 फेब्रुवारीला साजरी केली जाईल. सूर्याने एकदा मकर राशीत प्रवेश केल्यापासून पुन्हा तो मकर राशीत प्रवेश करेपर्यंत तीनशे पासष्ट दिवस सहा तास नऊ मिनिटे व दहा सेंकद एवढा कालावधी लागतो. ग्रेगरियन कॅलेंडरच्या नियमाप्रमाणे शतकपूर्तीच्या अंकास चारशेनी भाग जात नसेल, तर त्या वर्षी लीप वर्ष धरले जात नाही. त्यामुळे दर चारशे वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस तीन दिवसांनी पुढे जातो. तसेच दर वर्षीचा नऊ मिनिटे दहा सेकंद हा काळ साठत साठत जाऊन दर 157 वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस आणखी एक दिवसाने पुढे जातो.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


इतर बातम्या


Makar Sankranti 2023 : यंदाची मकर संक्रांती 14 की 15 जानेवारी? तारखेबाबत संभ्रम, जाणून घ्या काय सांगितलंय शास्त्रात?