Makar Sankranti 2024 Shani Dev :  मकर संक्रांतीचा सण आज 15 जानेवारीला साजरा होणार आहे. या दिवशी सूर्य उत्तरायण होतो. या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी सूर्यदेव आपला पुत्र शनिदेवाच्या घरी येतात. मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे, म्हणून याला मकर संक्रांत म्हणतात. मकर संक्रांतीच्या दिवशी देवी गंगा, सूर्यदेव आणि शनिदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे.


या गोष्टींमुळे शनिदेव प्रसन्न होतात


असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा नदीत स्नान केल्याने माणसाची सर्व पापे धुतली जातात. या दिवशी स्नान, ध्यान, पूजा, जप आणि दान केल्याने सूर्य आणि शनिदेव प्रसन्न होतात. विशेषत: मकर संक्रांतीच्या दिवशी दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे शनिदेवाचा विशेष आशीर्वाद मिळतो. या दिवशी शनिदेवाची कृपा मिळवायची असेल तर काही गोष्टींचे दान अवश्य करा.


तिळाचे दान


मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे खूप महत्त्व आहे. या तिळाच्या पाण्याने स्नान करावे आणि सूर्याला तिळाच्या पाण्यानेच जल अर्पण करावे. शनिदेवाला काळे तीळ खूप प्रिय आहेत. त्यामुळे शनिदेवाची कृपा मिळवायची असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे दान करा. तुम्ही तीळ असलेले अन्न देखील दान करू शकता. या दिवशी काळे तीळ दान केल्याने शनीच्या साडेसाती किंवा ढैय्याचा प्रभाव कमी होतो.



ब्लँकेट दान


मकर संक्रांतीच्या दिवशी ब्लँकेट दान करणे खूप शुभ मानले जाते. मकर संक्रांतीच्या काळात थंडी असते. अशा परिस्थितीत ब्लँकेट दान करणे खूप चांगले मानले जाते. या दिवशी गरजूंना ब्लँकेट दान केल्याने राहू आणि शनि या दोन्हींशी संबंधित अशुभ दूर होतात. शनिदेवाला काळा आणि निळा रंग आवडतात. त्यामुळे या रंगाची चादरी दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. याने सर्व ग्रह दोषही दूर होतात.


सात प्रकारचे धान्य दान


शनिदेवाला प्रसन्न करायचे असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी 7 प्रकारचे धान्य दान करा. यामध्ये तुम्ही उडीद डाळ, तांदूळ, काळी मसूर, बाजरी, सोललेली मूग डाळ देखील समाविष्ट करू शकता. रात्री शनिदेवाच्या नावाने हे दान केल्याने शनिदेव आशीर्वाद देतात आणि शनिदोषापासून मुक्ती देतात. या दिवशी गरीब व्यक्तीला सात प्रकारचे धान्य दान केल्याने माता अन्नपूर्णा देखील प्रसन्न होतात.


मोहरीच्या तेलाचे दान


मोहरीचे तेलही शनिदेवाला अतिशय प्रिय आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी मोहरीच्या तेलाचे दान करावे. असे मानले जाते की मोहरीचे तेल दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने सर्व प्रलंबित कामे लवकर पूर्ण होतात. या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. हा उपाय केल्याने शनिदेव लवकर प्रसन्न होतात.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Makar Sankranti 2024 : आज मकर संक्रांत! यंदा काळ्या रंगाचे कपडे घालायचे की नाही? संभ्रमात असाल तर एकदा हे वाचाच