Mahashivratri 2023 Shubh Muhurt : महाशिवरात्रीचा (Mahashivratri 2023) दिवस हा भगवान शंकराची पूजा करण्यासोबतच एखाद्या शुभ कार्यांसाठी देखील विशेष मानला जातो. या दिवशी नवीन वाहन खरेदी करणे, गृहप्रवेश करणे आणि इतर शुभ कार्ये केल्यास खूप शुभ फळ मिळते. कारण या दिवशी लोक वाहन, सोने आणि घर खरेदी करतात. याचे कारण असे आहे की, लोक महाशिवरात्रीचा दिवस हा शुभ मुहूर्त मानतात, अशात तुम्हाला या दिवशी वाहन खरेदी किंवा नवीन घरात प्रवेश करायचा असल्यास तुमच्यासाठी कोणता शुभ काळ उत्तम आहे? महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्ताबद्दल अधिक जाणून घेऊया


 


Mahashivratri 2023 : 18 फेब्रुवारीला वाहन खरेदीसाठी महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्त



महाशिवरात्रीला शिवाच्या पूजेच्या शुभ मुहूर्तासह, खरेदीसाठी देखील शुभ मुहूर्त देखील आवश्यक असतो. 18 फेब्रुवारी रोजी वाहन खरेदी करायचे असेल तर दुपारी 12.35 ते 2 या वेळेत चार चोघडिया काळात वाहन खरेदी करणे उत्तम आहे. या दिवशी 12:35 ते 4:49 ही वेळ वाहन खरेदीसाठी देखील वेळ चांगली आहे. जर तुम्हाला दिवसा खरेदी करता येत नसेल, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार संध्याकाळी 6.13 ते 7.48 या वेळेत वाहन खरेदी करू शकता.



Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीला गृहप्रवेश मुहूर्त


महाशिवरात्रीला घरखरेदीसाठी शुभ मुहूर्त नाही. जर तुम्हाला घरात प्रवेश करायचा असेल, तर दिवसाचे 2:00 ते 3:24 या वेळेत चोघडिया मुहूर्तात गृहप्रवेश करा. शक्य असल्यास, तुम्ही 22 फेब्रुवारी हा दिवस गृहप्रवेशासाठी निवडावा. कारण महाशिवरात्रीला पंचक पाळले जाईल.


 


Mahashivratri 2023  : महाशिवरात्रीला शिवपूजेचा शुभ मुहूर्त


महाशिवरात्रीला रात्री 8.30 वाजल्यापासून चतुर्दशी तिथी असेल. म्हणजे त्रयोदशी तिथी ही दिवसभर राहील. अशात महाशिवरात्री व्रत करणाऱ्या शिवभक्तांनी सकाळी 8.22 ते 9.46 या वेळेत भगवान शंकराची पूजा करावी. यानंतर, 2:00 ते 3:24 ही वेळ अभिषेक करण्यासाठी सर्वोत्तम असेल. यानंतर, चतुर्दशी तिथी संध्याकाळी सुरू झाल्यानंतर, भगवान शंकराचा अभिषेक करणे चांगले राहील. महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये मध्यरात्रीच्या पूजेला सर्वाधिक महत्त्व आहे. म्हणूनच रात्री 10:58 ते 1:36 पर्यंत भगवान शिवाचा अभिषेक करणे चांगले. जर तुम्हाला महाशिवरात्रीला चार तास पूजा करणे शक्य नसेल तर सकाळी आणि रात्री भगवान शंकराची पूजा करा, अभिषेक करा, ते तुमच्यासाठी खूप फलदायी ठरेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


इतर बातम्या


Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीला रुद्राभिषेकाचे मोठे महत्त्व, भगवान शिव मनोकामना करतील पूर्ण, जाणून घ्या