Maharashtra CM Oath Ceremony : 23 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीच्या निकालात महायुती सरकारला बहुमत मिळालं आहे. यामध्ये भाजपाला सर्वाधिक मतं मिळाली आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालात महायुती सरकारची ताकद आणि आत्मविश्वास दिसून आला. 


आता नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, महाष्ट्रातील नव्या सरकारचा शपथविधी सोहळा येत्या 29 नोव्हेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी ज्योतिष शास्त्रानुसार, पाहिल्यास शपथविधी दरम्यान ग्रहांची स्थिती काय असेल या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


शपथविधीच्या दिवशी अशी असणार ग्रहांची स्थिती 


29 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजताची कुंडली पाहिल्यास असे दिसून येते की, मिथुन रास लग्नच्या कुंडलीत लग्नेश बुध, सूर्यासह सहाव्या चरणात असतील. तर, मंगळ आपल्या नीच राशीत म्हणजेच कर्क राशीत दुसऱ्या चरणात, चंद्र केतूसह युती करत चतुर्थ स्थानी, शुक्र सप्तम चरणात शनी नवव्या स्थानी तर राहू दहाव्या स्थानी तसेच, बृहस्पती द्वादश चरणात असेल. 


चंद्र उत्तराफाल्गुनी नक्षत्रात असणार आहे. तर, दहाव्या स्थानी राहूचा प्रभाव , चौथ्या स्थानी चंद्र आणि केतुची युती असणार आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :    


Astrology : 'या' राशीच्या लोकांसाठी सोन्याची अंगठी किंवा दागिने घालणं अशुभ; एकापाठोपाठ येतात संकटं, वाचा ज्योतिष शास्त्रात काय म्हटलंय...