Astrology Tips : असं म्हणतात की, सोन्याचे दागिने (Gold) परिधान केल्याने आपल्या सौंदर्यात चार पटींनी आणखी वाढ होते. महिलांना (Women) तर सोनं खरेदी करणं प्रचंड आवडतात. त्यामुळेच सोनं खरेदीला इतकं महत्त्व आहे. पण, अनेकदा सोनं खरेदी करताना आपण कोणताच विचार करत नाही. पण, ज्योतिष शास्त्रानुसार, सोनं खरेदी करणं काही राशींच्या लोकांसाठी शुभ मानलं जात नाही. खरंतर, प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीत 9 ग्रह असतात. यांच्यानुसार व्यक्तीच्या जीवनावर परिणाम होतो. 

Continues below advertisement


आपल्या कुंडलीत असणारे ग्रह ज्या प्रकारे चाल चालतात अगदी त्याच प्रकारे त्याचा आपल्या जीवनावर परिणाम होतो. मात्र, कोणत्या राशीच्या लोकांनी सोनं परिधान करणं शुभ आणि कोणत्या राशींनी सोनं परिधान करणं अशुभ आहे. तसेच, याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो? आणि सोन्याचा कोणत्या ग्रहाशी संबंथ आहे हे जाणून घेऊयात. 


सोन्याचा संबंध 'या' ग्रहाशी आहे


ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाचा संबंध कोणत्या ना कोणत्या रत्न आणि धातुशी असतो. ज्या प्रकारे तांब्याचा संबंध सूर्य आणि लोखांडाचा संबंध शनीशी आहे. त्याच पद्धतीने सोन्याचा संबंध बृहस्पती ग्रहाशी मानण्यात आला आहे. सोनं धारण केल्याने बृहस्पती ग्रह मजबूत होतो. आणि आपल्या आयुष्यात धन-धान्य तसेच सुख-समृद्धी येते. पण, काही लोकांनी सोनं परिधान न करण्याचा सल्ला दिला जातो. 


रत्न शास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म मेष, सिंह, क्रक, धनु, मीन राशीच्या लग्न भावात झाला आहे. अशा लोकांनी सोनं परिधान करणं शुभ मानलं जातं. मात्र, तुमच्या कुंडलीत जर बृहस्पतीचं स्थान कमजोर असेल तरीही तुम्ही सोनं परिधान करु शकतात. यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहते. 


'या' लोकांनी सोनं परिधान करु नये 



  • वृषभ, मिथुन, मकर, तूळ, वृश्चिक आणि कुंभ राशीच्या लोकांनी सोनं परिधान करु नये. 

  • ज्या लोकांना पोटाशी संबंधित काही आजार असतील तर अशा लोकांनी सोनं परिधान करु नये. यामुळे तुमच्या व्यवसायावर वाईट परिणाम होऊ शकतो. 

  • ज्या लोकांना लठ्ठपणाशी संबंधित समस्या असतील अशा लोकांनी देखील सोनं परिधान करु नये. 

  • जे लोक तेल, कोळसा किंवा लोखंडाचं काम करतात अशा लोकांनीसुद्धा सोनं परिधान करु नये. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :      


Shani Gochar 2024 : शनीच्या संक्रमणामुळे 'या' 3 राशींवर कोसळणार दु:खाचा डोंगर; 2025 मध्ये सावधानतेचा इशारा