Chandrasekhar Bawankule नागपूर : मला वाईट वाटतं, हा महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचा अपमान आहे. ज्या मतदारांनी मत दिले, त्या मतदारांचा हा अपमान आहे. मविआचा (Maha Vikas Aghadi) जनादेशावर अविश्वास दाखवत त्याचा अपमान करत आहे. जनतेने डबल इंजिन सरकारला मतं दिली आहे, सरकारच्या योजनांना मत दिले आहे. आमचं सरकार उत्तम काम करू शकतं, असा जनतेचा विश्वास आहे. म्हणून जनादेश मिळाले आहे. जेव्हा लोकसभेत तुमचे एवढे खासदार निवडून आले, तेव्हा ईव्हीएम कशी चांगली होती? नांदेडच्या पोटनिवडणुकीमध्येही काँग्रेसचा उमेदवार जिंकला, तिथे ईव्हीएम चांगली होती? ईव्हीएम मॅनेज करून आम्ही दीड हजार मतं अधिक घेऊन जिंकू शकलो नसतो का? लोकसभेच्या पराभवातून आम्ही आत्मचिंतन केलं, शिकलो, पुढे गेलो आणि जिंकलो. सध्या ईव्हीएमवाल्यांना झोप लागत नाही आहे, जेव्हा झोप लागायला लागेल तेव्हा ते शांत होतील. असा पलटवार करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्या लोकांना वाटणारच की ते मुख्यमंत्री व्हावे. तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसून निर्णय घेतील. तुम्ही काळजी करू नका, लवकरच आमचे सरकार येत आहे. काँग्रेस यांचे मत का कमी झाले याकडे लक्ष द्यावे. महाविकासाठी तोंडाच्या वाफा काढण्यापेक्षा इंडियनमध्ये घोळ आहे, असं सांगून डांबरटपणा करण्यापेक्षा आपली मतं का कमी झाली याचा चिंतन करा. जनतेने यांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे, तसेच 440 व्होल्टचा करंटही दिला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही हरल्यानंतर आपल्या पराभवातून शिकलो पुढे गेलो. असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
कोणाला कोणते खाते,पालकमंत्री कुठे कोण?
गटनेता निवडण्याबाबत अजून तसा निरोप नाही आहे, निरोप आल्यावर कळवू. तीन पक्षांचे सरकारम बनवताना थोडा वेळ लागतोच, मंत्रीपद कसे वाटायचे, कोणाला कोणते खाते द्यायचे, पालकमंत्री कुठे कोण असेल, हे सर्व सूत्र तयार करून सरकार तयार होते. नुसतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे नाव निश्चित करणे एवढेच नसते. त्यामुळे काही काळ जाईल आणि लवकरच सरकार बसेल. शपथ नोव्हेंबर मध्ये होईल की डिसेंबर मध्ये होईल, हे काही पॅरामीटर नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत. असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
महायुतीचा मुख्यमंत्री लवकरच शपथ घेणार
मला याबद्दल फारशी माहिती नाही. याबद्दलची सर्व निर्णय आमचे केंद्रीय नेतृत्व आणि तीन पक्षाचे नेते बसून करतात. मी संघटनेचे काम पाहतो. दरम्यान, कामठी विधानसभेचे जनतेने 1 लाख 75 हजार मत देऊन 41 हजार मतांनी मला विजयी केले आहे. नागपूर जिल्ह्यात आज पहिला जनता दरबार घेऊन जनतेशी संवाद करत आहे. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे उपक्रम आहे. अशी प्रतिक्रिया ही बावनकुळे यांनी यावेळी दिली. भारतीय जनता पक्षाचे प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक नेत्याला वाटतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावे. मित्र पक्षाचे कार्यकर्त्यांना वाटते की त्यांचे नेते मुख्यमंत्री व्हावे. तिन्ही पक्षाचे नेते बसून निर्णय घेतील. लवकरच महायुतीचा मुख्यमंत्री शपथ घेणार. असेही ते म्हणाले.
त्यांना सरकार बनवण्यासाठी दीड महिना लागला
केंद्रीय नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयाला आम्ही भाजपम्हणून कधीच नाराज होत नाही. त्यांचा निर्णय अंतिम असतो. पक्षाचे नेते योग्य निर्णय करतात. तर उद्धव ठाकरेंनी जेव्हा भाजपसोबत बेईमानी केली, तेव्हा त्यांना सरकार बनवण्यासाठी दीड महिना लागला होता. आमचा सरकार योग्य पद्धतीने बनत आहे. आमची काळजी करण्याची गरज नाही. असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
हे ही वाचा