Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरुन वाद सुरु आहेत. निवडणूक जाहीर होऊन आठवडा उलटल्यानंतर आता सर्व पक्षांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण यावरुन दावे-प्रतिदावे सुरू आहेत. या सगळ्यादरम्यान एका प्रसिद्ध भविष्यकाराने महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? याबद्दल भाकित केलं आहे.


महाराष्ट्रात कोण जिंकणार?


ज्योतिषी अनिरुद्ध कुमार यांनी 12 ऑक्टोबरला पोस्ट केली आहे. ज्यात त्यांनी म्हटलंय, "ग्रह ताऱ्यांची स्थिती पाहता महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूक महायुती (एनडीए) जिंकेल"






कोण होणार पुढचा मुख्यमंत्री?


पुढे ज्योतिषी अनिरुद्ध कुमार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार? याबद्दल रविवारी, म्हणजेच 20 ऑक्टोबर 2024 रोजी देखील एक पोस्ट केली आहे. "देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री असतील," असं देवेंद्र फडणवीस यांचा फोटो पोस्ट करत ज्योतिषी अनिरुद्ध कुमार यांनी म्हटलं आहे.






मविआचा गुंता सोडवण्याची जबाबदारी थोरात यांच्यावर 


महाविकास आघाडीतील जाागावाटपासंदर्भातील कलह अद्याप मिटलेला नाही. त्यामुळे काँग्रेसला हा मुद्दा लवकर निकाली काढायचा आहे. त्यामुळे जागावाटपाचा मुद्दा मार्गी लावण्याची जबाबदारी आता काँग्रेसने बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी बोलण्यास सांगितले आहे. त्यामुळे मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे, असे खुद्द थोरात यांनीच सांगितले आहे. 


हेही वाचा :


मोठी बातमी : लॉरेन्स बिश्नोईला विधानसभा लढण्याची ऑफर, थेट झिशान सिद्दिकींविरोधात मैदानात उतरवण्याची तयारी!