Maha Kumbh 2025 : सध्या उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज (Prayagraj) येथे महाकुंभमेळा (Maha Kumbh) सुरु आहे. या महाकुंभमेळ्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक, साधू, महंत प्रयागराज येथे दाखल झाले आहेत. दरम्यान साध्वी हर्षा रिछारिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय. 


मात्र, मॉडेल साध्वी हर्षा यांना महाकुंभातील पहिले अमृत स्नान केल्याने आणि महामंडलेश्वर यांच्या शाही रथावर बसण्यावरुन वाद निर्माण झाला आहे. ज्यांनी अजून संन्यास घेतला नाही त्यांना संत-महात्मांच्या शाही रथावर स्थान देणंही चुकीचं आहे. अशा प्रकारे ज्योतिष पीठातील शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे साध्वी बनण्याचे नियम काय आहेत ते जाणून घेऊयात. 


साध्वी बनण्याचे 'हे' आहेत 8 नियम 


1. साध्वी बनण्यासाठी महिलांना फार कडक प्रक्रियेचा सामना करावा लागतो. यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. 


2. साध्वी बनण्याआधी त्या महिलेचं कुटुंब इतकंच नव्हे तर त्या व्यक्तीची जन्मपत्रिका देखील पाहिली जाते. 


3. त्याचबरोबर माझा माझ्या कुटुंबियांशी आणि समाजाशी कोणताच संबंध नाही हे सिद्ध करावं लागतं. मोहाचा त्याग करावा लागतो.  


4. तसेच, भौतिक सुख-सुविधांचा देखील त्याग करावा लागतो. तसेच, सात्विक बोजनाचा देखील त्याग करावा लागतो. 


5. त्याचबरोबर, साध्वींना आयुष्यभर भगव्या रंगाचं वस्त्र परिधान करावं लागतं. साध्वी होण्याआधी मुंडन करावं लागतं. त्यानंतर शुद्धीकरणासाठी एखाद्या पवित्र नदीत कमीत कमी 100 वेळा डुबकी मारावी लागते. 


6. साध्वी बनण्यासाठी सर्वात आधी गुरुची दीक्षा घ्यावी लागते त्यानंतर तुमचा साध्वी बनण्याचा मार्ग सोपा होतो. 


7. गुरु दीक्षेत गुरु आपल्या शिष्यांना मंत्र देण्याबरोबरच ज्ञानही देतात. गुरु दीक्षा घेतल्यानंतर संसाराचा मोह त्याग करावा लागतो. 


8. त्याचबरोबर, जेव्हा गुरु सेवा करण्याची संधी मिळते तेव्हा त्यांना आपल्या गुरुची सेवा करावी लागते. तसेच, त्यांच्या आदेशाचं पालन करावं लागतं. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:                                                                    


Prayagraj : महाकुंभातील सर्वात सुंदर साध्वी हर्षाच्या 'या' कामावर भडकले शंकराचार्य; म्हणाले फक्त सुंदर आहे म्हणून...