Maghi Ganesh Jayanti 2024: माघी गणेश जयंती (Maghi Ganesh Jayanti) यंदा 13 फेब्रुवारी रोजी सगळीकडे उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली जाणार आहे. गणेश जयंतीला विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी या नावानेही ओळखले जाते. माघ महिन्यात येणाऱ्या या गणेश जयंतीला विशेष महत्त्व आहे. यंदाच्या विनायक चतुर्थीला अंगारक योग आल्याने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या दिवशी श्रीगणरायाची विधिवत पूजा करून व्रत केल्यास प्रत्येक इच्छा पूर्ण होतात तसेच जीवनात सुख-समृद्धी कायम टीकून राहते असे म्हटले जाते. परंतु अनेकांच्या मनात गणेश जयंतीचे व्रत कोणी करावे? कधी उपवास ठेवावा? या विषयी अनेकांच्या मनात गोंधळ आहे. पंचागकर्ते मोहन दाते यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.
माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील गणेश चतुर्थी 13 फेब्रुवारीला आहे. 12 फेब्रुवारीला संध्याकाळी 5 वाजून 44 मिनिटांनी चतुर्थीला प्रारंभ होईल तर 13 फेब्रुवारी दुपारी दोन वाजून41 मिनिटानी संपणार आहे. सकाळी 11.29 ते दुपारी 1.42 ला समाप्त होणार आहे.
महाराष्ट्रात या दिवशी अनेक ठिकाणी तसेच काही घरांमध्ये ही दीड दिवसांसाठी गणपती बाप्पाचे घरी आगमन होते. काही सावर्जनिक गणेश मंडळही बाप्पाची प्राणप्रतिष्ठा दीड दिवसांसाठी करतात. तिलकुंद चतुर्थी ही 13 फेब्रवारीला नाही तर 12 फेब्रुवारीला आहे. तिलकुंद चतुर्थीच्या दिवशी महादेवाचे पूजन करावे लागते. ज्यांना गणेश जंयतीचा उत्साह साजरा करायचा आहे त्या गणेश भक्तांनी 13 फेब्रुवारीला हा उत्सव साजरा करावा.
माघी गणेश जयंतीचा उपवास कोणी करावा?
माघी चतुर्थीला अंगारक योग आहे. गणेश जयंती आणि विनायक चतुर्थीचा जे उपवास करतात त्यांनी या दिवशी उपवास करावा. या दिवशी भाविक उपवास करतात आणि गणपतीची पूजा करतात.गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने संकटे दूर होतात, जीवनातील अडथळे दूर होतात.
माघी गणेश जयंती आणि भाद्रपद महिन्याल गणपती पूजनात फरक काय?
माघी गणेश जयंती ही मंदिरात किंवा जिथे गणपतीची स्थापीत मूर्ती आहे तिथेच साजरी केली जाते. माघी गणेश जयंती मुख्यते ही मंदिरत साजरी केली जाते. भाद्रपद महिन्यात आपण पार्थिव गणेश पूजन प्रत्येकाच्या घरी करत असतो. परंतु जशी रामनवमी, श्रीकृष्ण जयंती, नरसिंह जयंती तशी ही माघी श्रीगणेश जयंती आहे. कश्यप आणि आदिती यांच्या पोटी जन्माला आलेला अवतार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा: