Magh Amavasya 2024 : अमावस्येला (Amavasya) पितरांची पूजा, स्नान-दान केल्याने भोलेनाथ, पूर्वज आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद मिळतो. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्या तिथीचे विशेष महत्त्व आहे. या वर्षी 10 मार्च 2024 रोजी येणारी अमावस्या माघी अमावस्या असून, अमावस्येची रात्र ही तांत्रिक क्रिया करण्यासाठी प्रभावी मानली जाते. अनेकदचा आपली आजी किंवा घरातील वडिलधाऱ्या व्यक्ती सांगतात की, आज कोणतेही शुभ काम करू नको. अमावस्या आली की बरेच जण घाबरतात. अमावस्या म्हणजे अशुभ दिवस असे मानले जाते. एवढचं नाही तर हिंदू धर्म शास्त्रानुसार अमावस्येच्या दिवळी काही वस्तू आणण्यास हिंदू धर्म शास्त्राने मनाई केली आहे. अमावस्येच्या दिवशी वस्तू घरात आणल्याने लक्ष्मी नाराज होते. या घरात गरिबी, दारिद्र्य, रोगराई येते. त्यामुळे चला तर जाणून घेऊया या वस्तू कोणत्या आहेत.
माघ अमावस्येला 9 मार्च सायंकाळी 6.18 मिनिटानी होणार असून 10 मार्चला दुपारी 2.30 वाजता समाप्त होणार आहे. अमावस्येच्या दिवशी आपण असे काही उपाय करू शकतो की आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येणार नाही. अमावस्येला काही कामे करण्यास हिंदू धर्म शास्त्राने मनाई केली. ही कामे केल्यास घरात दारिद्र्य येते. त्यामुळे ही कामे टाळली पाहिजे.
अमावस्येला या गोष्टी चुकूनही आणू नका घरात
- अमावस्येच्या दिवशी नवीन झाडू किंवा केससुणी आणू नये.अमावस्येच्या दिवशी नवीन केरसुणी खरेदी केली तर माता लक्ष्मी नाराज होते. तिचा नकारात्मक परिणाम होतो आणि घरात गरिबी आणि दारिद्रय येते.
- अमावस्येचा संबंध पितरांशी असतो. त्यामुळे अमावस्येला शुभ कार्यासाठी लागणरे साहित्य किंवा पुजेचे साहित्य घरात आणू नये. असे केल्यास घरात नकारत्मका येते किंवा शुभ कार्यात विघ्न येते. कारण पूजा साहित्य हे शुभ कार्यासाठी वापरले जाते.
- अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा ही प्राचीन काळापासून केली जाते. त्यामुळे या दिवशी मांस, मद्य असे पदार्थ घरी आणू नयेत. अशा गोष्टी आणणे आणि किंव सेवन करणे अशुभ मानले जाते. आरोग्याच्या दृष्टीने नाही तर अध्यात्माच्या दृष्टीने देखील ते अशुभ मानले जाते. यामुळे देवता नाराज होतात आणि आपण केलेल्या सत्कर्माते पुण्य मिळत नाही
- अमावस्येचा संबंध थेट पितरांशी आहे. अमावस्येच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्ध विधी केले जातात. अमावस्येचा दिवस हा चंद्र संक्रमणाचा काळ मानला जातो. या दिवशी वातावरणात नकारात्मक ऊर्जेचा संचार जास्त असतो.
- अमावस्येच्या दिवशी धन, धान्य खरेदी करू नये. धन धान्याचा संबध थेट लक्ष्मी देवीशी संबंध असतो. अमावस्येला धान्य खरेदी केल्याने थेट पितृदोष लागतो. अमावस्येच्या दिवशी धान्य घरात आल्याने त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही. ते धान्य पितरांना समर्पित होते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा: